Asian Games 2023: भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास, 72 वर्षात पहिल्यांदाच 'हे' घडलं

Asian Games 2023: हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा सातवा दिवस भारतासाठी संस्मरणीय ठरला.
Indian Badminton Team
Indian Badminton TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Asian Games 2023: हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा सातवा दिवस भारतासाठी संस्मरणीय ठरला.

आज भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्ध 10-2 असा ऐतिहासिक विजय नोंदवल्यामुळे भारतासाठी दोन सुवर्णपदके आली. टेबल टेनिसमध्ये महिला जोडीने जगज्जेत्या चीनच्या जोडीचा पराभव केला. स्क्वॉशमध्ये पाकिस्तानला हरवून भारताने सुवर्णपदक जिंकले.

यानंतर संध्याकाळपर्यंत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने इतिहास रचला. भारतीय संघाने प्रजासत्ताक कोरियाचा 3-2 असा पराभव केला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारताला एशियाडमधील चौथे पदक मिळणार आहे

दरम्यान, 1951 मध्ये प्रथमच आशियाई क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 72 वर्षांनंतर प्रथमच भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. म्हणजेच भारतीय संघाने आता आपले रौप्यपदक निश्चित केले आहे.

पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक स्पर्धेत भारताचे हे चौथे पदक असेल आणि किमान पहिले रौप्य किंवा पहिले सुवर्णही असेल. भारताच्या पुरुष बॅडमिंटन (Badminton) संघाने पहिल्यांदाच सय्यद मोदींच्या नेतृत्वाखाली 1986 मध्ये सोलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तर 1982 आणि 1974 मध्येही भारताने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

Indian Badminton Team
Asian Games 2023: भारताने 'स्क्वॉश'मध्ये रचला इतिहास, फायनलमध्ये पाकिस्तानला पछाडत जिंकले गोल्ड

उपांत्य फेरीत रोमांचक लढत झाली

उपांत्य फेरीच्या सामन्यात पाच सामने खेळले गेले, ज्यात भारताने कोरियाचा 3-2 असा पराभव केला. पहिल्या सामन्यात जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या एचएस प्रणॉयने पुरुष एकेरीत आपल्या कोरियन प्रतिस्पर्ध्याचा 18-21, 21-16, 21-19 असा पराभव केला.

यानंतर, भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी निराशा केली आणि भारताला (India) 2-0 अशी आघाडी घेता आली नाही. भारतीय जोडीचा इथे 18-21, 21-16, 21-19 असा पराभव झाला.

Indian Badminton Team
Asian Games 2023: हॉकीमध्येही भारताची बादशाहत कायम, पाकिस्तानचा 8 गोलने पराभव

यानंतर लक्ष्य सेनने युंग्यु लीचा 21-7, 21-9 असा सरळ गेममध्ये पराभव करत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर अर्जुन मदाथिल रामचंद्रन आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीचा दुहेरीत 16-21 आणि 11-21 असा पराभव झाला. स्कोअर 2-2 असा होता.

अखेरीस भारताच्या किदाम्बी श्रीकांतने हा सामना 12-21, 21-16 आणि 21-14 असा जिंकून भारताला 3-2 असा विजय मिळवून दिला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल, ज्याने उपांत्य फेरीत जपानचा 3-1 असा पराभव केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com