Asian Games 2023: भारताने 'स्क्वॉश'मध्ये रचला इतिहास, फायनलमध्ये पाकिस्तानला पछाडत जिंकले गोल्ड

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्क्वॉश इव्हेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल लढत झाली.
Asian Games 2023
Asian Games 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्क्वॉश इव्हेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल लढत झाली. या रोमहर्षक लढतीत भारताने अखेरच्या सेटमध्ये पाकिस्तानचा पराभव केला.

भारतीय स्क्वॉश मेन्स टीमने या गेममध्ये पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. सौरव घोषाल, अभय सिंग आणि महेश माणगावकर या भारतीय त्रिकुटाने सुवर्णपदक पटकावले. या सामन्याचा पहिला सेट पाकिस्तानने जिंकला, त्यात महेश माणगावकरला पराभवाचा सामना करावा लागला.

मात्र यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानचा सलग दोन सेटमध्ये पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी 10 वे सुवर्णपदक जिंकून भारतीय स्क्वॉश मेन्स टीमने इतिहास रचला.

सामन्यात पहिल्यांदा पाकिस्तान संघाने आघाडी घेतली होती, पण भारताने हार मानली नाही आणि अंतिम फेरीत त्यांचा वाईट पद्धतीने पराभव केला.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने (India) पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. अभय सिंगने नूर जमानचा 3-2 (11-7, 9-11, 8-11, 11-9, 12-10) असा पराभव केला.

तर सौरव घोषालने मोहम्मद असीम खानविरुद्ध 3-0 (11-5, 11-1, 11-3) असा विजय नोंदवला. महेश माणगावकरला मात्र नासिर इक्बालकडून 0-3 (8-11, 3-11, 2-11) असा पराभव पत्करावा लागला.

Asian Games 2023
Asian Games 2023: बोपण्णा आणि ऋतुजा जोडीचा चीनमध्ये जलवा, टेनिसमध्ये भारताला मिळाले 'सुवर्ण'

रोहन बोपण्णा-ऋतुजा जोडीनेही सुवर्णपदक पटकावले

भारताने शनिवारी नेमबाजीत रौप्यपदकासह पदकाचे खाते उघडले. भारतीय नेमबाज दिव्या टीएस आणि सरबजीत सिंग यांनी अव्वल पोडियम फिनिशसाठी चीनला कडवी झुंज दिली, पण सामना रौप्य पदकाने संपला.

त्यानंतर भारताच्या रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी चीनी तैपेईचा पराभव करुन टेनिस मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2023
Asian Games 2023: निखत जरीनची कमाल, पदक निश्चित करुन ऑलिम्पिकसाठी ठरली पात्र!

त्याचबरोबर, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पाच खेळाडूंनी अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. लांब उडीपटू मुरली श्रीशंकर आणि जेसविन ऑल्ड्रिन पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत भारताच्या जॉयथी याराजी आणि नित्या रामराज यांनी प्रवेश केला आहे. जिन्सन जॉन्सन आणि अजय कुमार सरोज 1500 मीटर शर्यतीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

Asian Games 2023
Asian Games 2023: क्रिकेट अन् नेमबाजीत भारताला ऐतिहासिक सुवर्ण, दुसऱ्या दिवशी 6 पदकांची कमाई

पदकतालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, भारत 7 व्या दिवशी पाचव्या स्थानावर घसरला होता. पण या दहाव्या सुवर्णासह भारत पुन्हा चौथ्या स्थानावर आला आहे. भारताने आतापर्यंत एकूण 10 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्यपदक जिंकले आहेत.

यजमान चीन 108 सुवर्ण, 65 रौप्य आणि 33 कांस्य पदके जिंकून अव्वल स्थानावर आहे. तर 28 सुवर्णांसह जपान आणि 27 सुवर्णांसह दक्षिण कोरिया (South Korea) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com