Dipa Karmakar: भारतीय क्रीडा क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिच्यावर डोपिंगच्या आरोपाखाली तब्बल २१ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. याबद्दल इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुष्टी केली आहे. तिच्यावर प्रतिबंधित पदार्थ सेवनाचा आरोप आहे.
तिच्या नमुन्यांमध्ये हायजेमिन ड्रग आढळले आहे. वर्ल्ड अँन्टी डोपिंग एजन्सीच्या प्रतिबंधित पदार्थांपैकी हायजेमिनही आहे. आता या आरोपामुळे तिच्यावर १० जुलै २०१० पर्यंत बंदी कायम राहाणार आहे.
इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने सांगितले आहे की 'फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक (FIG) च्या वतीने 11 ऑक्टोबर 2021 रोजी स्पर्धाबाह्य नियंत्रणाच्या कक्षेत दीपाचे नमुने घेण्यात आले होते. ते नमुने पॉजिटिव्ह आढळले आहेत.'
साल २०१६ मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती. हा भारतासाठी मोठा विक्रम होता. ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट होती. त्यावेळी तिने सिमोना बाईल्स, मारिया पासेका आणि गुइलिया स्टेइंग्रबर अशा जिम्नॅस्टचा सामना केला होता.
यापूर्वी जानेवारी २०२३ मध्ये भारतीय धावपटू द्यूती चंदवरही डोपिंगच्या आरोपामुळे तात्काळ बंदी घालण्यात आली. द्युतीच्या युरीन सँपलमध्ये अँडरिन (andarine), ओस्टारिन (ostarine) आणि लिगान्ड्रोल (ligandrol) हे पदार्थ आढळले होते. त्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.