Yuvraj Singh: राजकारणात उतरणार की नाही? युवराज सिंगनेच केला मोठा खुलासा; म्हणाला...

Yuvraj Singh Post: युवराज सिंग आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, अखेर त्यानेच स्वत: या चर्चांबद्दल पोस्ट करत खुलासा केला आहे.
Yuvraj Singh
Yuvraj SinghX/BCCI

Indian cricketer Yuvraj Singh refuted reports of contesting 2024 Lok Sabha elections

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग राजकारणात प्रवेश करू शकतो, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर होत होत्या. मात्र, आता याबद्दल स्वत: युवराज सिंगनेच एक्सवर (ट्वीटर) पोस्ट करत सत्याचा खुलासा केला आहे. त्याने तो राजकारणात जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या लोकसभा निवडणूक 2024 बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आगामी काही महिन्यातच लोकसभा निवडणूका होणार आहेत. या निवणूकांमध्ये युवराज गुरदासपूरमधून निवडणूक लढेल, अशा रिपोर्ट्स फिरत होते.

मात्र 42 वर्षीय युवराजने स्पष्ट केले आहे की त्याची राजकारणा येण्याती कोणतीही मनिषा नसून तो त्याच्या 'YOUWECAN' फाउंडेशनमधूनच लोकांची मदत करत राहाणार आहे.

Yuvraj Singh
Yuvraj Singh: प्रखरने 404 धावा ठोकत मोडला 24 वर्षे जुना विक्रम, पण युवी म्हणतोय, 'आनंदच आहे की...'

युवराजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की 'मीडिया रिपोर्ट्स चूकीचे आहेत. मी गुरदासपूरमधून निवडणूक लढवणार नाही. वेगवेगळ्या क्षमतेच्या लोकांना पाठिंबा देण्यात आणि मदत करण्याचीच माझी आवड आहे आणि मी माझ्या YOUWECAN फाउंडेशनमधून हे काम करत राहणार आहे. चला सर्वांनी मिळून आपापल्या क्षमतेनुसार काही बदल घडवण्याचा प्रयत्न करूया.'

सध्या गुरदासपूरमध्ये अभिनेता सनी देओल खासदार आहे. पण त्याच्या जागेवर आगामी निवडणूकीत युवराज भारतीय जनता पक्षाकडून उरणार असल्याचे म्हटले जात होते. ही चर्चा तेव्हापासून सुरू झाली, जेव्हा काही दिवसांपूर्वीच युवराजने केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली होती.

मात्र, आता त्यानेच स्पष्ट केले आहे की त्याची राजकारणात उतरण्याची इच्छा नाही.

Yuvraj Singh
Yuvraj Singh: 'अखेर 23 वर्षांपूर्वीची परतफेड झालीच...', भारताने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर युवीचं ट्वीट चर्चेत

युवराज भारताच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक राहिला आहे. युवराजने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 40 कसोटी सामन्यांत 3 शतके आणि 11 अर्धशतकांसह 1900 धावा केल्या असून 9 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने वनडेत 304 सामन्यात खेळताना 14 शतकांचा आणि 52 अर्धशतकांसह 8701 धावा केल्या आहेत.त्याने वनडेत 111 विकेट्सही घेतल्या आहेत.

त्याचबरोबर युवराजने 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com