IND vs AUS: कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे झाले निधन

ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका सुरु असतानाच भारतीय संघाचा भाग असलेल्या वेगवान गोलंदाजाला पितृशोक झाला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Umesh Yadav Father Death: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पण ही मालिका सुरू असतानाच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवसाठी दु:खद बातमी आली आहे. त्याचे वडील तिलक यादव यांचे निधन झाले आहे.

उमेशच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच्या वडिलांनी कोळशाच्या खाणीत काम करून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण केले होते. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर उमेश नागपूरला परतणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना इंदोरला 1 मार्चपासून खेळायचा आहे. त्यामुळे त्यापूर्वी उमेश पुन्हा भारतीय संघात सामील होऊ शकतो. दरम्यान, उमेशला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.

Team India
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन टीमची वनडे सिरीजसाठी घोषणा! भारताविरुद्ध तीन घातक खेळाडूंचे होणार कमबॅक

रिपोर्ट्सनुसार तिलक यादव गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याच आजाराशी लढताना त्यांनी आपला जीव गमावला. अखेरचा श्वास घेतला, त्यावेळी त्यांचे वय 74 वर्षे होते.

त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. पण कामानिमित्त ते नागपूरमधील खापरखेडा येथे स्थायिक झाले. तिथेच त्यांचे कुटुंबही स्थायिक झाले. त्यांना उमेशव्यतिरिक्त कमलेश, रमेश ही दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार नागपूरमध्येच करण्यात आला.

Team India
IND vs AUS: टीम इंडियाचे हे 5 धाकड तिसर्‍या कसोटीत कांगारुंचा ठरणार 'काळ', इंदूरच्या स्टेडियमवर...

उमेशने सरकारी नोकरी करावी अशी होती वडिलांची इच्छा

दरम्यान, तिलक यादव यांची इच्छा होती की उमेशने सरकारी नोकरी करावी. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी उमेशने प्रयत्नही केला होता. मात्र, त्याचे मन क्रिकेटमध्ये अधिक रमले. त्याने विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेटही खेळण्यास सुरुवात केली.

दरम्यान, त्याने भारतीय संघाकडून 2010 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले. त्याने भारतीय संघात स्थान मिळवत त्याच्या वडिलांचेच नाही, तर कुटुंबाची मान अभिमानाने ताठ केली.

पण, सध्या उमेश नियमितपणे भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरत आहे. त्याने आत्तापर्यंत 54 कसोटी सामने खेळले असून 165 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 75 वनडे सामने खेळले असून 106 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 9 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून 12 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com