IND vs AUS: टीम इंडियाचे हे 5 धाकड तिसर्‍या कसोटीत कांगारुंचा ठरणार 'काळ', इंदूरच्या स्टेडियमवर...

India vs Australia, 3rd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
Team India
Team India Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia, 3rd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 1 मार्चपासून सुरु होणारा तिसरा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया आता मालिका काबीज करण्यासाठी उत्सुक आहे.

दरम्यान, पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रविचंद्रन अश्विनच्या चेंडूंसमोर नतमस्तक होताना दिसले आहेत, ज्यामुळे त्यांना पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये 3 दिवसातच पराभवाला सामोरे जावे लागले.

Team India
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाची साडेसाती संपेना! हेजलवूडनंतर दिग्गज सलामीवीरही कसोटी मालिकेतून बाहेर

आता टीम इंडिया (Team India) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका काबीज करण्यासाठी उत्सुक आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे काम तमाम करु शकणारे भारतीय संघाचे 5 खेळाडू आहेत.

1. रवींद्र जडेजा

या चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत रवींद्र जडेजा हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा काळ ठरला आहे. रवींद्र जडेजाने या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, बॅटनेही तो आपला जलवा दाखवत आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा काळ ठरेल.

Team India
IND vs AUS: पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाच्या खिलाडूवृत्तीने जिंकली मनं! 100 व्या कसोटीसाठी पुजाराला स्पेशल गिफ्ट

2. रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल टीम इंडियासाठी सलामीला उतरु शकतो. रोहित शर्मा सध्याच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 183 धावा करणारा फलंदाज आहे.

तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये आहे, जिथे खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. अशा स्थितीत रोहित शर्माला या मैदानावर द्विशतक झळकावण्याची संधी असेल. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावताना रोहित शर्माने 120 धावांची खेळी केली.

3. मोहम्मद शमी

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मोहम्मद शमीची आगपाखड फिरकी गोलंदाजांना उपयुक्त खेळपट्टीवरही पाहायला मिळाली.

मोहम्मद शमीने या मालिकेत आतापर्यंत 7 विकेट घेतल्या आहेत. शमीची शानदार गोलंदाजी भारताला लवकर विकेट मिळवून देण्यात यशस्वी ठरत आहे. शमीने आपल्या अचूक लाईन लेन्थने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खूप त्रास दिला आहे.

Team India
IND vs AUS: टीम इंडियाची शेवटच्या दोन कसोटी अन् वनडे मालिकेसाठी घोषणा! रोहित-हार्दिक करणार नेतृत्व

4. विराट कोहली

भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धोकादायक ठरु शकतो.

5. रविचंद्रन अश्विन

या चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धोका ठरला आहे. रविचंद्रन अश्विनने या मालिकेत आतापर्यंत 14 विकेट घेतल्या आहेत. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा काळ ठरेल.

इंदूरच्या होळकर मैदानावर रविचंद्रन अश्विनची गोलंदाजीची सरासरी 12.50 आहे. म्हणजेच, इंदूरच्या या मैदानावर रविचंद्रन अश्विन प्रत्येक 12 धावांनंतर विकेट घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com