Sachin Tendulkar Birthday: 'फॅमिलीमॅन' सचिनच्या कुटुंबातील सदस्य माहित आहेत का? पाहा फोटो

सचिनच्या कुटुंबाचे पाहा गोड फोटो
Sachin Tendulkar Family
Sachin Tendulkar FamilyDainik Gomantak
Published on

Sachin Tendulkar Family सचिन तेंडुलकरने मैदानात खेळताना अनेक विक्रम नावावर केले असले, तरी तो मैदानाबाहेर मात्र फॅमिलीमॅन म्हणून ओळखला गेला. सचिनने नेहमीच त्याच्या क्रिकेटबरोबर त्याच्या कुटुंबालाही महत्त्व दिले. त्याने वेळोवेळी त्याचा कुटुंबाने त्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारही व्यक्त केले आहेत.

Sachin Tendulkar Mother
Sachin Tendulkar MotherDainik Gomantak

सचिनची आई रजनी तेंडुंलकर या सुरुवातीला एका इंश्युरन्स कंपनीमध्ये नोकरी करायच्या.त्यांनी सचिनला प्रत्यक्ष मैदानावर खेळताना पहिल्यांदा त्याच्या २०० व्या कसोटीत म्हणजेच अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पाहिले होते.

Sachin Tendulkar Family
Sachin Tendulkar FamilyDainik Gomantak

सचिनचे वडील लेखक आणि कवी होते. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. तसेच ते किर्ती कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणूनही नोकरी करायचे. सचिनवर त्याच्या वडिलांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. सचिन १९९९ साली वर्ल्डकप खेळत असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Sachin Tendulkar's Siblings
Sachin Tendulkar's Siblings Dainik Gomantak

सचिनला दोन मोठे भाऊ आणि एक बहिण देखील आहे. त्याच्या सर्वात मोठ्या भावाचे नाव नितीन तेंडुलकर आहे. नितीन देखील लेखक असून एअर इंडियामध्ये नोकरी करतात.

Sachin Tendulkar's Brothers
Sachin Tendulkar's BrothersDainik Gomantak

तसेच सचिनच्या दुसऱ्या मोठ्या भावाचे नाव अजित आहे. सचिन अजित यांच्या फार जवळ असून त्यांनीच सचिनला सुरुवातीला क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी आचरेकर सरांकडे नेले होते. सचिननेही सांगितले आहे की त्याच्या कारकिर्दीत अजितचे महत्त्व मोठे राहिले आहे.

Sachin Tendulkar's Siblings
Sachin Tendulkar's Siblings Dainik Gomantak

सचिनच्या बहिणीचे नाव सविता असून तिनेच त्याला त्याच्या आयुष्यातील पहिली बॅटही घेऊन दिली होती.

Sachin Tendulkar wife Anjali
Sachin Tendulkar wife AnjaliDainik Gomantak

सचिनने २४ मे १९९५ रोजी पेशाने डॉक्टर असलेल्या अंजली मेहताबरोबर लग्नगाठ बांधली. आज २५ वर्षांनंतरही त्यांचा संसार सुखाने सुरू आहे. या जोडप्याला सारा आणि अर्जुन ही मुलंही आहेत.सचिन अंजलीबरोबरचे फोटो अनेकदा शेअर करत असतो.

Sachin Tendulkar Daughter Sara
Sachin Tendulkar Daughter SaraDainik Gomantak

सचिनची मुलगी साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ मध्ये झाला. ती देखील अंजलीप्रमाणे वैद्यकिय शिक्षण घेत आहे.

Sachin and Arjun Tendulkar
Sachin and Arjun TendulkarDainik Gomantak

सचिनचा मुलगा अर्जुन सारापेक्षा २ वर्षांनी लहान असून त्याने नुकतेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. तो अष्टपैलू खेळाडू असून तो देखील सचिन प्रमाणेच क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवत आहे.

Sachin Tendulkar Aunt
Sachin Tendulkar AuntDainik Gomantak

सचिनच्या आयुष्यात त्याच्या काकूचेही योगदान मोठे राहिले. तो शारदाश्रम शाळेत असताना काही वर्षे काका-काकूंकडे राहिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com