Kedar Jadhav: टीम इंडियाचा क्रिकेटर केदार जाधवचे वडील राहात्या घरातून बेपत्ता, तक्रारही दाखल

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील पुण्यातून हरवले असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
Kedar Jadhav with Father
Kedar Jadhav with FatherDainik Gomantak

Kedar Jadhav Father Missing: भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. केदारचे वडील महादेव जाधव पुण्यातील कोथरूड भागातून आज (27 मार्च) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

Kedar Jadhav with Father
Team India: ठरलं तर! टी20 मालिकेसाठी ऑगस्टमध्ये भारतीय संघ करणार 'या' देशाचा दौरा

समोर आलेल्या माहितीनुसार, केदार जाधवचा परिवार कोथरूड भागात राहायला आहे. महादेव जाधव यांनी आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेऊन गेले मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत आहे. तसेच त्यांच्या हरवल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.

Kedar Jadhav with Father
Team India वर बसतोय 'चोकर्स'चा शिक्का! गेल्या दहा वर्षातील तब्बल 15 ICC स्पर्धाच आहेत पुरावा

दरम्यान, केदार जाधव भारतीय संघाकडून 2014 ते 2020 या सहा वर्षात क्रिकेट खेळला आहे. त्याने 73 वनडे सामने खेळले आहेत. तसेच 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 27 विकेट्सही घेतल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये 122 धावा केल्या असून यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com