Shubman Gill: गिल आता बनणार भारतीय 'स्पायडर मॅन'! नक्की काय भानगड, जाणून घ्या

भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आता भारतीय स्पायडर मॅन म्हणून समोर येणार आहे.
Shubman Gill | Spider-Man
Shubman Gill | Spider-ManDainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill as Indian Spider Man: भारताचा युवा प्रतिभावान क्रिकेटपटू शुभमन गिलचा आवाज आता स्पायडर मॅन म्हणून ऐकू येणार आहे. खरंतर भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकर या भूमिकेला गिल आवाज देणार आहे. याबद्दल सोमवारी घोषणा झाली आहे.

स्पायडर मॅन: अक्रॉ, द स्पायडर वर्स या ऍनिमेटेड चित्रपटाच्या व्हर्जनमधील भूमिकांना भारतीय टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यातून भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरचे पदार्पण होणार आहे. या भूमिकेसाठी हिंदी आणि पंजाबी भाषेतील डबिंगसाठी शुभमन गिलचा आवाज वापरण्यात येणार आहे. याच भूमिकेसाठी इंग्लिश भाषेतील आवाज भारतीय वंशाचा अमेरिकन अभिनेता करण सोनी देणार आहे.

यापूर्वी 2005 साली अमेरिकेतील कॉमिक बूक मार्व्हलमध्ये पवित्र प्रभाकरचा उल्लेख करण्यात आला होता. जो एका छोट्या गावात राहातो.

Shubman Gill | Spider-Man
Shubman Gill Video: कांगारुंविरुद्ध सेंच्यूरी ठोकत गिलनं जिंकलं दिल! पाहा कशी होती किंग कोहलीची रिऍक्शन

दरम्यान, गिलने या चित्रपटासाठी आवाज देण्याबद्दल आनंद व्यक्त केला असून एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे की 'शुभ मॅन आणि स्पायडरमॅन आहे. स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स मध्ये भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरसाठी माझा आवाज देण्यासाठी उत्सुक आहे. ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाईल. ऍक्शनसाठी तयार व्हा.'

तसेच शुभमनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसले की वेगवेगळी लोकं छताकडे पाहून शुभमनला खाली उतरण्यास सांगत आहेत. त्यानंतर शेवटी तो खाली उतरून म्हणतो की 'चला सुरू करुया. क्रिकेटपटू असो किंवा कोणी सुपर हिरो मोठ्या शक्तीसह मोठी जबाबदारीही येते.'

Shubman Gill | Spider-Man
Yuzvendra Chahal: युझी आता IPL मध्ये 'नंबर वन'! चहलने ब्रावोच्या ऐतिहासिक रेकॉर्डची केली बरोबरी

गिलने ही घोषणा केल्यानंतर आता अनेक स्पायडर मॅन चाहत्यांसह क्रिकेट चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला असून अनेकांनी ते गिलचा स्पायडर मॅनच्या भूमिकेतील आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

भारतात स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स हा चित्रपट इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, गुजराती, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम या 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com