IND vs AFG: जयस्वाल-दुबेची तुफानी फटकेबाजी! दुसरा T20I सामना जिंकत भारताने मालिकाही घातली खिशात

India vs Afghanistan: यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतके करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Yashasvi Jaiswal - Shivam Dube
Yashasvi Jaiswal - Shivam DubePTI

India vs Afghanistan, 2nd T20I match at Indore:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात रविवारी (14 जानेवारी) टी20 मालिकेतील दुसरा सामना झाला. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. यासह भारतीय संघाने या मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने 15.4 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. भारताकडून शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक अर्धशतके केली.

या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला उतरले होते. मात्र, पहिल्याच षटकात रोहित पहिलाच चेंडू खेळत असताना फझलहक फारुकीने त्रिफळाचीत केले. त्यामुळे रोहितला शुन्यावर माघारी परतावे लागले.

Yashasvi Jaiswal - Shivam Dube
IND vs ENG: मोहम्मद शमी अन् प्रसिध कृष्णाला का मिळाली नाही टीम इंडियात संधी? कारण आले समोर

मात्र, त्यानंतर जयस्वालला 14 महिन्यांनंतर भारताच्या टी20 संघात पुनरागमन केलेल्या विराट कोहलीने चांगली साथ दिली. या दोघांनी आक्रमक खेळताना अर्धशतकी भागीदारी केली. पण 6 व्या षटकात नवीन उल हकने विराटला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. विराटने 16 चेंडूत 29 धावा केल्या.

मात्र, असे असले तरी जयस्वाल आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने लय बिघडू दिली नाही. त्यांनी चौकार षटकारांची बरसात केली. दुबेने 10 व्या षटकात मोहम्मद नबीविरुद्ध सलग तीन षटकारही खेचले. जयस्वाल आणि दुबे या दोघांनी 92 धावांची भागीदारी केली.

त्यांची भागीदारी 13 व्या षटकात करिम जनातने तोडली. त्याने जयस्वालला बाद केले. याच षटकात त्याने जितेश शर्मालाही शुन्यावर माघारी धाडले.

पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे मुकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करताना जयस्वालने 34 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह 68 धावा केल्या. नंतर दुबेला रिंकू सिंगने साथ दिली आणि भारताचा विजय 16 व्या षटकात निश्चित केला. दुबे 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 63 धावांवर नाबाद राहिला. रिंकूने नाबाद 9 धावा केल्या.

Yashasvi Jaiswal - Shivam Dube
IND vs AFG: भारतीय गोलंदाज चमकले, अफगाणिस्तान ऑलआऊट! टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांची गरज

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने ३५ चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तसेच नजिबुल्लाह झद्रान (23), करिम जनात (20) आणि मुजीब उर रेहमान (21) यांनी छोटेखानी पण आक्रमक खेळी केल्या.

पण या चौघांव्यतिरिक्त अफगाणिस्तानकडून कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. अफगाणिस्तानचा संघ 20 षटकात 172 धावांवर सर्वबाद झाला.

भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबेने एक विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com