दम खम! BCCI ची मोठी घोषणा, महिला खेळाडूंना मिळणार पुरुष क्रिकेटर्स एवढा पगार

BCCI ने एक मोठी घोषणा केली आहे.
Indian women's Cricket Team
Indian women's Cricket TeamDainik Gomantak

Team India: BCCI ने एक मोठी घोषणा केली आहे. आता भारतीय महिला संघाला पुरुष संघाप्रमाणेच मॅच फी मिळणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करुन ही मोठी घोषणा केली आहे. शाहांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'भारतीय महिला संघाला पुरुष संघाप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटी (15 लाख), एकदिवसीय (6 लाख), T20 (3 लाख) उपलब्ध असतील.

भारतीय महिला क्रिकेट संघाला आता एवढा पगार मिळणार

भारतीय पुरुष संघातील खेळाडूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी सहा आणि टी-20 सामन्यांसाठी तीन लाख रुपये मॅच फी मिळते. बोर्डाच्या या निर्णयानंतर आता करारबद्ध महिला संघातील खेळाडूंनाही समान मॅच फी मिळणार असून, त्यामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

Indian women's Cricket Team
IND Vs PAK: टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? BCCI प्रमुखांचे मोठे वक्तव्य

बीसीसीआयची मोठी घोषणा

बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी सांगितले की, 'टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी पुरुष क्रिकेटर्संना 3 लाख रुपये मिळतात. आता हीच फी महिला क्रिकेटपटूंनाही दिली जाणार आहे.' या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल जय शहांनी अपेक्स कौन्सिलचेही आभार मानले आहेत.

Indian women's Cricket Team
BCCI, PCB चा वाद! आशिया चषकात तुम्ही नाही आले तर, विश्वचषकासाठी आम्ही नाही येणार

शाहांनी पुढे सांगितले की, 'भारतीय महिला संघाला पुरुष संघाप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटी (15 लाख), एकदिवसीय (6 लाख), T20 (3 लाख) उपलब्ध असतील. वेतन समानता ही आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी माझी बांधिलकी होती, आणि पाठिंब्याबद्दल मी अ‍ॅपेक्स कौन्सिलचे आभार मानतो'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com