INDW vs AUSW: जेमिमाहचं शतक हुकलं, तर पुजाची तळात झुंज; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे आव्हान

India vs Australia Women: भारतीय महिला संघाने वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Jemimah Rodrigues - Pooja Vastrakar
Jemimah Rodrigues - Pooja VastrakarX/BCCIWomen
Published on
Updated on

India vs Australia Women, 1st ODI match at Wankhede Stadium:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात गुरुवारपासून (28 डिसेंबर) वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 282 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून जेमिमाह रोड्रिग्सने आणि पुजा वस्त्राकर यांनी अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. शफाली वर्मा (१), ऋचा घोष (21) आणि हरमनप्रीत कौर (9) स्वस्तात बाद झाल्या.

Jemimah Rodrigues - Pooja Vastrakar
SA vs IND: 'कोणीच इतके महान नाही की...' केएल राहुलचे टीकांबद्दल परखड भाष्य

नंतर यास्तिका भाटीया आणि जेमिमाह रोड्रिग्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यास्तिकाही 49 धावांवर 20 व्या षटकात बाद झाली. नंतर दीप्ती शर्माने रोड्रिग्सला साथ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दीप्तीही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मोठी खेळी करू शकली नाही. ती 21 धावांवर बाद झाली.

अमनज्योत कौरने रोड्रिग्ससह 45 धावांची भागीदारी करत भारताला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. पण अमनज्योत 20 धावांवर बाद झाली. पाठोपाठ स्नेह राणानेही 1 धावेवर विकेट गमावली.

Jemimah Rodrigues - Pooja Vastrakar
SA vs IND: टीम इंडियाच्या कामी आली ब्रॉडची ट्रिक, विराटने लावलं डोकं अन् मग..., पाहा Video

त्यानंतर रोड्रिग्सला 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पुजा वस्त्राकरने भक्कम साथ दिली. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला 250 धावांचा टप्पा गाठून दिला. या दोघींची जोडी जमली असतानाच शतकाच्या जवळ असलेल्या रोड्रिग्सला 47 व्या षटकात ऍश्ले गार्डनरने बाद केले. त्यामुळे तिची आणि पुजाची 68 धावांची भागीदारी तुटली.

पण पुजाने आपला चांगला खेळ पुढे कायम केला. तिने अर्धशतक ठोकत भारताला 282 धावांपर्यंत पोहचवले. रोड्रिग्सने 77 चेंडूत 7 चौकारांसह 82 धावांची खेळी केली. तसेच पुजाने 46 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 62 धावा केल्या. रेणूका सिंग 5 धावांवर नाबाद राहिली.

ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वेरहॅम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच डार्सी ब्राऊन, मेगन शट आणि ऍनाबेल सदरलँड्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Women's Asia Cup 2026
New York India Day Parade 2026
Bangladesh Defeated Australia
Beach Shack Policy Extension
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com