भारत आणि वेस्ट इंडीज (India and West Indies) दरम्यान शुक्रवारपासून (दि.22) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (One Day Series) सुरू होणार आहे. यामालिकेसाठी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीतीमध्ये शिखर धवनसोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न आहे. सध्या टिम समोर ईशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी दाखवलेला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ओपनिंगसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. ऋतुराज गायकवाडने हजारे ट्रॉफीमध्ये पाच सामन्यात चार शतकांच्या मदतीने 693 धावा फटकावल्या आहेत. ईशान किशनही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने टी 20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सलामीची संधी कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
असा आहे भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध्द कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.