IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Five Centuries In A Single ODI Match: भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात बुधवारी (30 सप्टेंबर) गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळला गेलेला दुसरा वनडे सामना क्रिकेट विश्वाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला.
Five Centuries In A Single ODI Match
Five Centuries In A Single ODI MatchDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Five Centuries In A Single ODI Match: भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात बुधवारी (30 सप्टेंबर) गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळला गेलेला दुसरा वनडे सामना क्रिकेट विश्वाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. या महामुकाबल्यात विक्रमांची अक्षरशः बरसात झाली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय वेस्टइंडीजच्या फलंदाजांनी अक्षरशः धुळीस मिळवला आणि 50 षटकांत तब्बल 405 धावांचा अजस्र डोंगर उभा केला. वेस्टइंडीजकडून जॉन कॅम्पबेलने 101 धावा, कर्णधार शे होप यांनी 104 धावा आणि आमिर जंगूने 114 धावांची नाबाद शतकी खेळी खेळली. या तीन दमदार शतकांच्या जोरावर वेस्टइंडीजने भारतासमोर 406 धावांचे अतिशय कठीण लक्ष्य ठेवून नवा इतिहास रचला.

वनडे क्रिकेटच्या 55 वर्षांच्या संपूर्ण इतिहासात कधीही घडले नाही, ते या सामन्यात पाहायला मिळाले. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीच्या जोडीने वेस्टइंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 255 धावांची रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. या दोघांनीही शतके झळकवली. रोहित शर्माने 101 धावांची तूफानी खेळी खेळली, तर युवा फलंदाज शुभमन गिलने नाबाद 223 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली.

Five Centuries In A Single ODI Match
Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

या सामन्यात दोन्ही बाजूंकडून एकूण 5 शतके झळकली. 1971 मध्ये सुरु झालेल्या वनडे क्रिकेटमध्ये 5 हजारांहून अधिक सामने खेळले गेले, पण एकाच वनडे सामन्यात 5 शतके लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी केवळ तीन वेळा एका सामन्यात चार शतके झळकल्याची नोंद आहे.

Five Centuries In A Single ODI Match
Virat Khdapkar World Record: जिद्द, धैर्य आणि चिकाटी... गोव्याच्या 6 वर्षांच्या मुलाचा 'विराट' विक्रम, पायी गाठले केदारनाथ; 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

या सामन्याने वेस्टइंडीज संघाच्या नावावरही एक अनोखा विक्रम नोंदवला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात तीन फलंदाजांनी शतके झळकावण्याची ही केवळ सहावी वेळ आहे, आणि वेस्टइंडीजने आपल्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच ही कामगिरी केली. याशिवाय, भारताच्या (India) विरोधात वनडे सामन्यात दुसऱ्यांदा कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाच्या तीन फलंदाजांनी एकाच डावात शतके ठोकली. या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, वेस्टइंडीजच्या तिघांनी शतके झळकावूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Five Centuries In A Single ODI Match
Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

यापूर्वी, जेव्हा कधी कोणत्याही संघाच्या तीन फलंदाजांनी शतके केली होती, तेव्हा ती टीम कधीही हरली नव्हती. हा थरारक सामना भारताने आपल्या नावावर करत क्रीडा जगतात नवा विक्रम प्रस्थापित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com