IND vs SL: ईशान किशनची चित्त्याची चपळाई, डाईव्ह मारत घेतला 'सुपर कॅच', पाहा Video

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात ईशान किशनने अविश्वसनीय झेल घेतला आहे.
Ishan Kishan catch
Ishan Kishan catchDainik Gomantak
Published on
Updated on

Ishan Kishan Catch: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 2 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात यष्टीरक्षक ईशान किशनने घेतलेला एक झेल चर्चेचा विषय ठरला.

या सामन्यात ईशान किशनने भारताकडून यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली. ही जबाबदारी सांभाळताना त्याने श्रीलंकेचा चरिथ असलंकाचा शानदार झेल घेतला. श्रीलंकेचा संघ भारताने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 7 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ईशानने 12 धावांवर खेळणाऱ्या असलंकाचा हा झेल घेतला.

Ishan Kishan catch
IND vs SL: पहिल्या T20 मधूनच झाले स्पष्ट, 'या' खेळाडूला बेंचवर बसून पाहावी लागणार मालिका!

झाले असे की असलंका उमरान मलिकने टाकलेल्या या वेगवान चेंडूवर फटका मारण्यास चूकला. त्यामुळे चेंडू सरळ वर उंच उडाला. ते पाहून ईशान मागे पळत गेला आणि त्याने तो झेल घेत असल्याचे संघसहकाऱ्यांना सांगितले. त्याने नंतर झेपावत हा झेल पूर्ण केला.

त्याचा हा झेल पाहून कर्णधार हार्दिक पंड्याही चकीत होऊन हसत होता. त्याने हा झेल घेताना केलेल्या प्रयत्नांचे सध्या कौतुक होत आहे.

भारताचा अखेरच्या क्षणी विजय

दरम्यान, हा सामना अटीतटीचा झाला. भारताने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला संघर्ष करावा लागला, पण तरी त्यांनी तगडी लढत दिली होती. अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 13 धावांचीच गरज होती.

पण अक्षर पटेलने या षटकात गोलंदाजी करताना 10 धावाच दिल्या. याशिवाय श्रीलंकेने 2 विकेट्स धावबादच्या रुपात गमावल्या. त्यामुळे त्यांना 20 षटकात सर्वबाद 160 धावा करता आल्या आणि भारताने हा सामना जिंकला. भारताकडून शिवम मावीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच उमरान मलिक आणि हर्षल पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Ishan Kishan catch
IND vs SL: 'कदाचीत पराभूत झालो असतो, पण...' हार्दिककडून अक्षरला 20वी ओव्हर देण्याचे कारण स्पष्ट

तत्पूर्वी भारताकडून चांगली सुरुवात झाली नव्हती. भारताने 46 धावातच 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण अखेरीस दीपक हुडा आणि अक्षर पटेलने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने 20 षटकात 5 बाद 162 धावा केल्या.

हुडाने नाबाद 41 आणि अक्षरने नाबाद 31 धावा केल्या. त्यांनी 68 धावांची नाबाद भागीदारीही केली. त्याआधी ईशानने 37 धावांची आणि हार्दिकने 29 धावांची खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com