India vs Sri Lanka: भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी, अखेर 'हे' 3 धाकड मारणार मैदान

India vs Sri Lanka Odi Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका (IND vs SL) 10 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Sri Lanka Odi Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका (IND vs SL) 10 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेसोबतच टीम इंडिया 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारीही सुरु करणार आहे. ही मालिका भारतीय चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे तीन एकदिवसीय सामने जिंकणारे खेळाडू काही महिन्यांनंतर एकत्र वनडे खेळताना दिसणार आहेत.

हे खेळाडू काही महिन्यांनंतर एकत्र वनडे खेळतील

या मालिकेत टीम इंडियाची (Team India) कमान रोहित शर्माकडे असेल. त्याचवेळी धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीही ब्रेकनंतर संघात पुनरागमन करणार आहे. या मालिकेसाठी निवड समितीने धोकादायक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) संघात समावेश केला आहे. या तिन्ही खेळाडूंनी 14 जुलै 2022 रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचवेळी, याआधी हे खेळाडू जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकत्र वनडे खेळताना दिसले होते.

Team India
India vs Sri Lanka: 'कॅप्टन' पंड्याने चालू ठेवली परंपरा! मालिका विजयानंतरच्या कृतीने जिंकली मनं

दुखापतीमुळे संघाबाहेर होता

जसप्रीत बुमराह काही काळापासून दुखापतीशी झुंजत होता. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला, तर त्याने 14 जुलै 2022 रोजी इंग्लंड विरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. दुखापतीमुळे आशिया कप 2022 आणि T20 विश्वचषक 2022 सारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही तो भारतीय संघाचा भाग नव्हता.

T20 मालिकेत स्थान मिळाले नाही

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत केएल राहुलही या मालिकेतून संघात परतणार आहे. या तिन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. टीम इंडिया आता पूर्ण ताकदीनिशी या वनडे मालिकेत उतरणार आहे.

Team India
India vs Sri Lanka: रोहितच्या नेतृत्वाखाली 'या' खेळाडूला मिळणार संधी, टी-20 मालिकेत...!

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com