IND vs SL: टीम इंडियासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला 'हा' खेळाडू, पांड्याचा विश्वासही गमावला

India vs Sri Lanka, 2nd T20I: पुण्यातील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात एक खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Sri Lanka, 2nd T20I: पुण्यातील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात एक खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला आहे. या खेळाडूने आपल्या खराब कामगिरीने कर्णधार हार्दिक पांड्याचा देखील विश्वास गमावला आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने या खेळाडूला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठ्या आत्मविश्वासाने संधी दिली होती. मात्र या खेळाडूने अशी कामगिरी केली की टीम इंडिया अडचणीत आली. खर्‍या अर्थाने या खेळाडूला दुसऱ्या टी-20 सामन्यात संधी देऊन कर्णधार हार्दिक पांड्याने स्वत:च्या पायावर दगड मारुन घेतला आहे.

दुसऱ्या T20 सामन्यात हा खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पुण्यातील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) संधी देऊन सर्वात मोठी चूक केली. अर्शदीप सिंगने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात अत्यंत खराब गोलंदाजी केली, त्याने 2 षटकात 37 धावा दिल्या आणि यादरम्यान त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात अर्शदीप सिंगने 5 नो-बॉल टाकले. अर्शदीपच्या या खराब गोलंदाजीचा फायदा घेत श्रीलंकेच्या फलंदाजांनी तूफान फटकेबाजी केली. अर्शदीप सिंगने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात 18.50 च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या.

Team India
IND vs SL, T20I: श्रीलंकेची दाणादाण उडवण्यासाठी विदर्भाचा फलंदाज सज्ज, सॅमसनची घेणार जागा?

कर्णधार पांड्याच्या विश्वासाला तडा गेला

श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंगने ज्या पद्धतीने कामगिरी केली, त्यामुळे त्याने कर्णधार हार्दिक पांड्याचा विश्वास गमावला आहे. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना 7 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाईल आणि त्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या अर्शदीप सिंगला डावलून युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संधी देऊ शकतो.

Team India
IND vs SL: प्रतिक्षा संपली! घरच्याच मैदानावर राहुल त्रिपाठीचं पदार्पण, असं राहिलंय आजपर्यंतचं करिअर

दुसरीकडे, आयपीएल 2023 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमारला 5.50 कोटी रुपयांना विकत घेतले. मुकेश कुमारने 33 प्रथम श्रेणी सामन्यात 123 विकेट घेतल्या आहेत. त्याने 24 लिस्ट ए सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये मुकेशच्या नावावर 23 सामन्यात 25 विकेट आहेत. विशेष म्हणजे, मुकेशने यावर्षी रणजी ट्रॉफीमध्ये 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com