Ind Vs NZ Match Cancel: मैदानात पावसाचा खेळ; मग ड्रेसिंग रूममध्ये फुटबॉल खेळून क्रिकेटर्सचा टाईमपास

क्रिकेटपटुंवरही 'फिफा वर्ल्डकप'चा फिव्हर; दुसरा सामना 20 नोव्हेंबर रोजी
Ind Vs NZ Match Cancel:
Ind Vs NZ Match Cancel:Dainik Gomantak

Ind Vs NZ Match Cancel: टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधील लाजिरवाण्या पराभवानंतर न्युझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा पहिला टी-20 सामना पावसाने रद्द झाला आहे. दरम्यान, एकीकडे मैदानात पावसाचा खेळ सुरू असताना दोन्ही संघातील खेळाडूंनी क्रिकेटला ब्रेक देत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.

Ind Vs NZ Match Cancel:
FIFA WC 2022 Trophy: 18 कॅरेट सोन्यापासून बनते फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी; इटलीच्या एकाच कुटुंबाकडे ट्रॉफी बनविण्याचा अधिकार

भारत-न्यूझीलंड यांच्या तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी पहिला सामना आज, शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये होणार होता. या सामन्यावर पावसाचे सावट होते. तथापि, सामन्याच्या वेळेमध्ये पाऊस नसले असे वाटले होते. पण, दोन्ही संघांच्या आणि क्रिकेट चाहत्यांच्या आशेवर पावसाने पाणी फेरले. दुपारी 12 वाजता सामना सुरू होणार होता. पण वेलिंग्टनमध्ये एकसलग पाऊस सुरू राहिला. पाऊस न थांबल्याने दीड ते पावणे दोन तास वाट पाहून अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तथापि, दोन्ही संघातील खेळाडूंना मैदानावर एकमेकांना भिडता आले नसले म्हणून काय झाले, या क्रिकेटर्सनी ड्रेसिंग रूममध्ये फुटबॉल खेळाचा आनंद लुटला. दरम्यान, दोन्ही संघांमध्ये दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.

Ind Vs NZ Match Cancel:
FIFA World Cup 2022 Tickets : एवढ्या लाखात मिळतंय 1 तिकीट; जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पाहायचे

सूर्यकुमार यादव रिझवानचा विक्रम मोडणार

भारताचा मिस्टर 360 डीग्री सूर्यकुमार यादव याच्याकडे एका वर्षात टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविण्याची संधी आहे. सध्या पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यात आघाडीवर आहे. रिझवानने 2021 मध्ये 1326 धावा केल्या होत्या. तर सूर्यकुमारने या वर्षात आत्तापर्यंत 1040 धावा केल्या आहेत.

निवड समितीने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंवर विश्वास टाकला आहे. त्यामुळे या संघात ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या हेच ज्येष्ठ खेळाडू आहेत. बाकी बहुतांश खेळाडू नवे आणि अनुभव नसलेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com