Hardik Pandya: कॅप्टन पंड्याची बॅटिंगच नाय, तर बॉलिंगही एकदम कडक! रेकॉर्ड्स एकदा पाहाच

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs New Zealand, 3rd T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांची टी20 मालिका बुधवारी संपली. या मालिकेतील तिसरा सामना भारताने 168 धावांनी जिंकला आणि मालिकेतही 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. तिसऱ्या टी20 सामन्यातील या विजयात कर्णधार हार्दिक पंड्याचे योगदान महत्त्वाचे राहिले.

हार्दिकने या सामन्यात फलंदाजी करताना 17 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावांची खेळी केली. तसेच या सामन्यात 126 धावांची नाबाद शतकी खेळी केलेल्या शुभमन गिलबरोबर 103 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारीही केली.

तसेच त्याने गोलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. हार्दिकने 4 षटके गोलंदाजी करताना 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने फिन ऍलेन, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन आणि ब्लेअर टिकनर यांना बाद करत न्यूझीलंडला मोठे धक्के दिले.

Hardik Pandya
Hardik Pandya च्या कारकिर्दीत धोनीने निभावली सर्वात महत्त्वाची भूमिका

त्यामुळे हार्दिक हा भारताचा असा पहिलाच कर्णधार ठरला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 30 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आणि ४ विकेट्सही घेतल्या. तसेच कोणत्याही क्रिकेट प्रकारात अनिल कुंबळेनंतर अशी कामगिरी करणाराही तो पहिला पुरुष कर्णधार ठरला आहे.

हार्दिकपूर्वी अनिल कुंबळे अखेरचा भारतीय कर्णधार होता, ज्याने एका सामन्यात 30 किंवा त्यापेक्षा धावा आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या. कुंबळेने 2008 साली सिडनी कसोटीत अशी कामगिरी केली होती. त्यानंतर भारताच्या कोणत्याही कर्णधाराला ही कामगिरी करता आली नव्हती.

हार्दिकने तिसऱ्यांदा केला पराक्रम

हार्दिकने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 30 किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि 4 विकेट्स घेण्याची ही एकूण तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने 2018 साली ब्रिस्टोलला इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यांत नाबाद 33 धावा केल्या होत्या आणि 4 विकेट्सही घेतल्या होत्या.

त्यानंतर 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच साऊथॅम्पटन येथे झालेल्या टी20 सामन्यात त्याने 51 धावांची खेळी केली होती आणि 4 विकेट्सही घेतल्या होत्या.

Hardik Pandya
Hardik Pandya होऊ शकतो टीम इंडियाचा पुढचा कर्णधार, पाकिस्तानी दिग्गजांचा पाठिंबा

हार्दिक मालिकावीर

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे हार्दिकने मालिकावीर पुरस्कारही नावावर केला. त्याने या मालिकेत 5 विकेट्स घेतल्या, त्यामुळे या मालिकेत तो अर्शदीप सिंगसह सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानी राहिला.

तसेच त्याने तीन सामन्यांत फलंदाजी करताना 66 धावा केल्या. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याने या मालिकेतील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात 5 व्या क्रमांकावर आणि दुसऱ्या सामन्यात 6 व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com