Hardik Pandya होऊ शकतो टीम इंडियाचा पुढचा कर्णधार, पाकिस्तानी दिग्गजांचा पाठिंबा

हार्दिक पांड्याने आपल्या खेळातील समज पाहून सर्वांनाच त्याचे फॅन बनवले आहे. पांड्याकडे आता टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या चर्चेचा विषय राहिला आहे. त्याच्या खेळातील उत्कृष्ट आकलनामुळे आता हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनाही हार्दिक पांड्या टीम इंडियाचा (Team India) पुढचा कर्णधार बनू शकतो, असा विश्वास आहे.

वसीम अक्रम म्हणाला, “जर तुम्ही हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) पाहिले तर त्याने पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवले आहे आणि तेही आयपीएलमध्ये. पण किती अप्रतिम मार्गाने त्याने संघाचे नेतृत्व केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाला आयपीएल जिंकण्यात यश आले. त्याला दबाव कसा हाताळायचा हे माहित आहे.

पंड्याच्या विश्वासामुळेच टीम इंडियाला विजय मिळवता आला, असे अक्रमचे मत आहे. माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, “हार्दिक पांड्याची भूमिका संघातील फिनिशरची आहे. जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असाल तेव्हाच तुम्हाला फिनिशरची भूमिका मिळते. पंड्या खेळात प्रगती कशी करायची हे पाहत होता.

Hardik Pandya
IND Vs SA: पहिल्या T20 मध्ये हे 4 खेळाडू बनतील मॅच विनर, तिरुअनंतपुरमची खेळपट्टी...

पांड्या कर्णधार झाल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही, असे वकार म्हणाला. पांड्याचे कौतुक करताना माजी कर्णधार म्हणाला, “पहिल्यांदा तो आयपीएलमध्ये (IPL) कर्णधार झाला आणि जिंकण्यात यशस्वी झाला. आता तो टीम इंडियाचा मुख्य खेळाडू बनला आहे. तो कॅप्टनला सल्ला देतो. तो थंड मनाने विचार करतो आणि पुढे जात असतो. 

रविवारी मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने विराट कोहलीसह टीम इंडियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने अत्यंत कठीण परिस्थितीत 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com