India vs New Zealand 3rd T20 Tied: पावसामुळे भारत-न्युझीलंड सामना अनिर्णित; भारताने मालिका 1-0 ने जिंकली

मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या
India vs New Zealand 3rd T20 Tied
India vs New Zealand 3rd T20 TiedDainik Gomantak
Published on
Updated on

India vs New Zealand 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला. पहिल्या सामना पावसामुळ होऊ शकला नव्हता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका भारताने 1-0 ने जिंकली.

India vs New Zealand 3rd T20 Tied
Iran Football Team to be Jailed?: इराणच्या फुटबॉल संघाला होणार तुरूंगवास?

161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 21 धावांवर तीन विकेट पडल्या आहेत. इशान किशन 10 धावा करून बाद झाला, ऋषभ पंत 11 धावांवर बाद झाला तर श्रेयस अय्यर पहिल्या चेंडूवरच बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा मिस्टर 360 डीग्री सूर्यकुमार यादव देखील 10 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. 9 ओव्हर्सनंतर भारताची अवस्था 4 आऊट 75 अशी झालेली असताना पावसाला सुरवात झाल्याने खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर पाऊस न थांबल्याने सामना अर्निर्णित घोषित करण्यात आला.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात न्युझीलंडच्या संघाची धुरा कर्णधार म्हणून टीम साऊदी सांभाळत आहे. नाणेफेकीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये अर्शदीपने फिन अॅलनला पायचिक केले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मोहम्मद सिराजने मार्क चॅपमनला झेलबाद केले. तेव्हा न्युझीलंडची अवस्था 2 बाद 46 अशी होती.

त्यानंतर कॉनवे-फिलिप्सने न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यांनी संघाचे शतक धावफलकावर लावले. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना ग्लेन फिलिप्सने आपली विकेट गमावली. त्याने 5 चौकार, 3 षटकारांसह 33 चेंडुत 54 धावा केल्या. सिराजने 16 व्या षटकात ग्लेन फिलिप्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

यानंतर अर्शदीप सिंगने 17 व्या षटकात डेव्हॉन कॉनवेला झेलबाद केले. कॉनवे 49 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. त्याचवेळी 18 व्या षटकात सिराजने नीशमला पंतकरवी झेलबाद केले. नीशमला सलग दोन सामन्यांत खातेही उघडता आले नाही. त्याच षटकात सिराजने मिचेल सँटनरला चहलकडे झेलबाद केले.

India vs New Zealand 3rd T20 Tied
Cristiano Ronaldo Dominates Instagram: इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला सेलिब्रिटी बनला रोनाल्डो

मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने नेपियर T-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये न्यूझीलंडला 160 धावांत रोखले. सिराज आणि अर्शदीप या दोघांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. एका क्षणी न्यूझीलंड सहज 180 ते 190 धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु न्यूझीलंडने शेवटच्या 14 धावांमध्ये सात विकेट गमावल्या.

भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकल्यास न्यूझीलंडच्या भूमीवर भारताचा हा सलग दुसरा टी-20 मालिका विजय ठरेल. याआधी 2020 मध्ये शेवटच्या दौऱ्यात टीम इंडियाने टी-20 मालिका 5-0 ने जिंकली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com