India vs New Zealand: द्विशतक एक, रेकॉर्ड्स अनेक! शुभमन गिल भल्याभल्या दिग्गजांना पडला भारी

शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतकासह अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
Shubman Gill Double Century
Shubman Gill Double CenturyDainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill: बुधवारी भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला. हैदराबादला झालेल्या या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने द्विशतकी खेळी केली. यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

शुभमन गिलने 145 चेंडूत त्याचे द्विशतक पूर्ण केले होते. त्याने या सामन्यात 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले. तो वनडेत द्विशतक करणारा भारताचा पाचवा आणि एकूण जगातील आठवा खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर (200*), विरेंद्र सेहवाग (219), रोहित शर्मा (209, 208*, 264) आणि ईशान किशन (210) यांनी द्विशतके केली आहे. तसेच फखर जमान (210*), ख्रिल गेल (215) आणि मार्टिन गप्टील (237*) यांनीही वनडेत द्विशतके केली आहेत.

Shubman Gill Double Century
India vs New Zealand: ईशान किशन 'या' जागेवर करणार बॅटिंग, कॅप्टन रोहितने स्पष्टच सांगितलं

द्विशतक करणारा युवा क्रिकेटपटू

शुभमन गिल वनडेत द्विशतक करणारा सर्वात युवा क्रिकेटपटूही ठरला आहे. त्याने जेव्हा द्विशतक केले, तेव्हा त्याचे वय 23 वर्षे 132 दिवस होते. त्याने या विक्रमाच्या यादीत ईशान किशनला मागे टाकले आहे. किशनने 24 वर्षे 145 दिवस वय असताना द्विशतक केले होते. किशनने त्याचे द्विशतक गेल्याच महिन्यात म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते.

न्यूझीलंड विरुद्ध सर्वोच्च खेळी

गिल न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाराही फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या नाबाद 186 धावांच्या खेळीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. सचिननेही हैदराबादमध्येच 1999 साली ही खेळी न्यूझीलंडविरुद्ध केली होती.

Shubman Gill Double Century
India vs New Zealand: वनडेमध्ये कोणाचं वर्चस्व? एका क्लिकवर जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

23 व्या वर्षीच विराटला टाकले मागे

वयाच्या 23 व्या वर्षी वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने वयाच्या 23 व्या वर्षी 183 धावांची खेळी केली होती. त्यापाठोपाठ क्विंटॉन डी कॉक असून त्याने 23 व्या वर्षी 178 धावांची खेळी केली होती.

कमी डावात तिसरे शतक

गिलचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतकही ठरले. त्याने 19व्या वनडे डावात खेळताना हे शतक केले. त्यामुळे तो सर्वात जलद तीन वनडे शतके करणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला. या यादीत अव्वल क्रमांकावर शिखर धवन असून त्याने 17 डावांमध्ये तीन वनडे शतके झळकावली होती.

Shubman Gill Double Century
Shubman Gill: टीम इंडियाच्या प्रिन्सचा डबल धमाका! सचिन, सेहवाग, रोहित सर्वांनाच टाकलं मागे

सर्वात जलद 1000 धावा

गिलने त्याचे द्विशतक पूर्ण करताना वनडे कारकिर्दीत 1000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला.

त्याने याबाबतीत पाकिस्तानचा फलंदाज इमाम-उल-हकची बरोबरी केली. इमामनेही 19 डावात 1000 वनडे धावा केल्या होत्या. तसेच 18 डावात 1000 वनडे धावा करणारा फखर जमान या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर गिल भारताकडून सर्वात जलद 1000 वनडे धावा करणारा फलंदाज आहे. त्याने विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे टाकले आहे. विराटने आणि शिखर यांनी प्रत्येकी 24 डावात 1000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com