India vs Lebanon: लेबनॉनला हरवून टीम इंडियाने जिंकला इंटरकॉन्टिनेंटल कप, सुनील छेत्रीच्या गोलने जिंकली मने

Intercontinental Cup: भारताच्या फुटबॉल संघाने पुन्हा एकदा इंटरकॉन्टिनेंटल चषकाचे विजेतेपद पटकावले आहे.
Sunil Chhetri
Sunil ChhetriDainik Gomantak

Intercontinental Cup: भारताच्या फुटबॉल संघाने पुन्हा एकदा इंटरकॉन्टिनेंटल चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने लेबनॉनचा 2-0 असा पराभव केला. हाफ टाईमपर्यंत उभय संघांमध्ये चुरशीच्या लढतीनंतर टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आणि 21 मिनिटांतच गोल करत आघाडी घेतली.

दरम्यान, भारतीय संघासाठी सुनील छेत्रीने 46 व्या मिनिटाला आणि लल्लियांझुआला छांगटेने 65 व्या मिनिटाला शानदार गोल केला. यानंतर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु राहिली, मात्र लेबनीज संघाला एकही गोल करता आला नाही. अखेर टीम इंडियाने (Team India) हा सामना जिंकून विजेतेपदावर कब्जा केला.

Sunil Chhetri
ISL 2022-23: सुनील छेत्रीच्या गोलने ड्रामा! केरला ब्लास्टर्सने चालू सामन्यात सोडलं मैदान, नक्की झालं काय?

सुनील छेत्रीच्या गोलने मने जिंकली

अंतिम फेरीत सुनील छेत्रीने शानदार गोल केला. 46 व्या मिनिटाला हा गोल करताना सांघिक कामगिरीचे उत्तम दर्शन घडले. छेत्रीने शानदार पास आणि असिस्ट करत गोलवर शिक्कामोर्तब केले. यानंतर संपूर्ण टीमने आनंदाने उड्या मारल्या.

Sunil Chhetri
मिताली राज, आर. अश्विन, सुनील छेत्री यांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

टीम इंडियाने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले. 2018 मध्ये भारतीय संघाने शेवटच्या वेळी ही स्पर्धा जिंकली होती. त्याचवेळी, 2019 मध्ये दक्षिण कोरियाचा (South Korea) संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर भारत चौथ्या स्थानावर राहिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com