IND vs ENG: टीम इंडियाचा विजयोत्सव, भारताने उडवला यजमानांचा धुव्वा

ओव्हलमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला.
Jaspreet Bumrah & Rohit Sharma
Jaspreet Bumrah & Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

India Vs England First ODI: ओव्हलमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यामध्ये टीम इंडियाच्या विजयाचा जसप्रीत बुमराह हिरो ठरला, ज्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. बुमराहने 7.2 षटकात 19 धावा देत 6 बळी घेतले. बुमराहच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने यजमानांना 110 धावांत गुंडाळण्यात यश मिळविले.

दरम्यान, भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील इंग्लंडची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. 111 धावांचे लक्ष्य रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवनच्या जोडीने 18.4 षटकात विकेट न गमावता पूर्ण केले. यादरम्यान रोहितने 58 चेंडूत 76 धावांची खेळी केली, तर धवनने 31 धावा केल्या. उत्कृष्ट कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना 14 जुलै रोजी क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर होणार आहे.

Jaspreet Bumrah & Rohit Sharma
IND vs ENG: टीम इंडियाचा विजयोत्सव, भारताने उडवला यजमानांचा धुव्वा

दुसरीकडे, भारताने (Inidia) पहिल्यांदा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय वेगवान गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी केली. यादरम्यान बुमराह इंग्लंडमध्ये वनडेमध्ये पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध इंग्लंडची ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com