IND vs ENG: स्टोक्सने जिंकला टॉस, भारताची बॉलिंग; पहिल्या कसोटीसाठी असे आहेत 'प्लेइंग-11'

India vs England, 1st Test: गुरुवारपासून सुरु झालेल्या भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकला आहे.
India vs England
India vs EnglandX/BCCI and PTI

India vs England 1st test Match at Hyderabad, Playing XI

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून (25 जानेवारी) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करेल. या सामन्यासाठी भारताने तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज असे संमिश्रण प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आहे.

फिरकी गोलंदाजीसाठी रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे चायनामन कुलदीप यादव याला पहिल्या सामन्यासाठी बेंचवर बसावे लागणार आहे. तसेच वेगवान गोलंदाजीसाठी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

India vs England
IND vs ENG: सुरु होणार कसोटीचा थरार, भारत-इंग्लंड आमने-सामने उभे ठाकणार! कुठे अन् केव्हा पाहाणार मॅच, जाणून घ्या

या सामन्यासाठी इंग्लंड संघाकडून फिरकीपटू टॉम हार्टलीचे पदार्पण झाले आहे. तसेच इंग्लंजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑली पोप, बेन फोक्स, रेहान अहमद आणि जॅक लीच यांचे पुनरागमन झाले आहे.

मात्र इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला संधी देण्यात आलेली नाही. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पूर्णवेळ वेगवान गोलंदाज म्हणून केवळ मार्क वूडचा पर्याय आहे.

India vs England
IND vs ENG: 'मी विसा ऑफिसमध्ये नाही, पण आशा आहे...' शोएब बाशिर वादावर स्टोक्सनंतर रोहितचंही भाष्य

आमने-सामने कामगिरी

भारत आणि इंग्लंड संघात आत्तापर्यंत 131 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 31 सामने भारताने जिंकले आहेत. तसेच 50 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. त्याचबरोबर 50 सामने अनिर्णित राहिले आहेत.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • इंग्लंड - झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लीच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com