INDW vs AUSW: भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; दुसऱ्या वनडेत 21 वर्षीय अष्टपैलूचे पदार्पण, पाहा प्लेइंग-11

Shreyanka Patil: भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना शनिवारी होत आहे.
Shreyanka Patil - Harmanpreet Kaur
Shreyanka Patil - Harmanpreet KaurX/BCCI
Published on
Updated on

India Women vs Australia Women, 2nd ODI at Wankhede Stadium, Mumbai :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात शनिवारी वनडे मालिकेचा दुसरा सामना होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार एलिसा हेलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतली आहे.

या सामन्यातून भारतीय संघाकडून 21 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू श्रेयंका पाटीलचे वनडे पदार्पण झाले आहे. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हस्ते वनडे पदार्पणाची कॅप देण्यात आली आहे. ती भारतीय महिला संघाडून वनडेत पदार्पण करणारा 141 वी खेळाडू ठरली आहे. श्रेयंकाला सायका इशाकच्या जागेवर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

श्रेयंकाने याच महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तिने आत्तापर्यंत भारताकडून 3 वनडे सामने खेळले असून 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Shreyanka Patil - Harmanpreet Kaur
INDW vs AUSW: सुपरवूमन! हवेत सूर मारत स्नेह राणाने घेतला ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा अफलातून झेल, पाहा Video

तसेच ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. त्यांनी मेगन शटच्या जागेवर किम गर्थला संधी दिली आहे.

भारतासाठी 'करो वा मरो' सामना

या वनडे मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 1-0 अशा आघाडीवर आहे. त्यामुळे दुसरा सामना भारतासाठी निर्णायक आहे.

या सामन्यात जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर ते विजयी आघाडी घेतील आणि भारताचे मालिकेतील आव्हान संपेल. तसेच जर भारताने दुसऱ्या वनडेत विजय मिळवला, तर मालिकेत 1-1 अशी बरोबरी होईल आणि तिसरा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरेल.

Shreyanka Patil - Harmanpreet Kaur
INDW Vs AUSW: पहिल्या वनडेत टीम इंडियाचा दारुण पराभव, जेमिमाहची दमदार खेळी व्यर्थ!

प्लेइंग इलेव्हन -

  • भारतीय महिला - स्मृती मानधना, यास्तिका भाटिया(यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर(कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष, स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.

  • ऑस्ट्रेलिया महिला - एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, ऍश्ले गार्डनर, ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम, ऍलना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com