R Ashwin @450: अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा! कॅरीची विकेट घेत रचला इतिहास

नागपूर कसोटीच्या पहिल्याच डावात आर अश्विनने 3 विकेट्स घेत भारतासाठी मोठा विक्रम रचला आहे.
R Ashwin
R Ashwin Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरला विदर्भ क्रिकेट असोसिएशनवर सुरू आहे. या सामन्यादरम्यान आर अश्विनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात अश्विनने पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या. दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरीला बाद करताच कसोटीत 450 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कसोटीत तो 450 विकेट्स घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज ठरला आहे.

यापूर्वी भारताच्या केवळ अनिल कुंबळेनी असा पराक्रम केला आहे. कुंबळेनी कसोटीत 619 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो 450 कसोटी विकेट्सचा टप्पा पार करणारा जगातील नववा खेळाडू ठरला आहे.

R Ashwin
IND vs AUS: 'हा' रेकॉर्ड करताच किंग कोहली बसणार सचिन-पाँटिंगच्या पंक्तीत

अश्विनच्या आता 89 कसोटीतील 167 डावात 24.23 च्या सरासरीने 452 विकेट्स झाल्या आहेत. त्यामुळे तो कसोटीत सामन्यांच्या तुलनेत सर्वात जलद 450 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे.

मुरलीधरनने 80 कसोटी सामन्यांत 450 विकेट्सचा टप्पा पार केला होता. तसेच या यादीत मुरलीधरन आणि अश्विन यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे. कुंबळेने 93 कसोटीत 450 विकेट्सचा टप्पा गाठला होता. त्यामुळे अश्विन सर्वात जलद 450 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाजही ठरला आहे.

कसोटीत 450 विकेट्स घेण्यासाठी सर्वात कमी सामने खेळलेले गोलंदाज

80 सामने - मुथय्या मुरलीधरन

89 सामने - आर अश्विन

93 सामने - अनिल कुंबळे

100 सामने - ग्लेन मॅकग्रा

101 सामने - शेन वॉर्न

R Ashwin
IND vs AUS Video: शमी-सिराजचे ऑसी ओपनर्सला जबरदस्त धक्के! पहिल्या कसोटीत टीम इंडियाची दमदार सुरुवात

ऑस्ट्रेलिया 177 धावांत गारद

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा पहिला डाव 63.5 षटकात 177 धावांवरच संपुष्टात आला. भारताकडून या डावात रविंद्र जडेजाने सर्वोत्तम गोलंदाजी करताना 22 षटकात 47 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

तसेच आर अश्विनने 15.5 षटके गोलंदाजी करताना 42 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या दोघांव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून या डावात मार्नस लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ स्टीव्हन स्मिथने 37 धावांची खेळी केली, तर पीटर हँड्सकॉम्बने 31 आणि ऍलेक्स कॅरेने 36 धावांची खेळी केली. या चौघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com