Rohit Sharma: दीड वर्षांनी कसोटी शतक झळकावत हिटमॅनचं भन्नाट सेलिब्रेशन, Video Viral

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर जोरदार जल्लोष केला.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

India vs Australia: गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली. त्याने शतक केल्यानंतर जोरदार जल्लोषही केला.

रोहितने या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात शतक पूर्ण केले. त्याने 171 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह त्याचे हे शतक पूर्ण केले. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील नववे शतक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 43 वे शतक आहे.

दरम्यान रोहितने तब्बल दीडवर्षांनी कसोटीत शतक केले आहे. यापूर्वी त्याने अखेरच्या वेळी सप्टेंबर 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतक केले होते.

Rohit Sharma
IND vs AUS: रोहितच मायदेशात 'हिटमॅन'! कसोटीतील 'या' रेकॉर्ड लिस्टमध्ये आता केवळ ब्रॅडमन पुढे

रोहितने 63 व्या षटकात टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत त्याचे हे शतक पूर्ण केले. त्याने शतक करतानाच मोठा जल्लोष केला. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की रोहितने शतकाचे सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या रविंद्र जडेजाने त्याला मिठी मारत अभिनंदन केले. तसेच या दोघांमध्ये काहीतरी मजेशीर संवादही झाल्याचे या व्हिडिओतून दिसते. तसेच रोहितने शतक केल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधीलही सर्व सदस्यांनी उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

Rohit Sharma
IND vs AUS: आनंद अन् अभिमान! लेकाचं कौतुक करण्यासाठी आई मैदानात, KS Bharat चा भावूक क्षण व्हायरल

कर्णधार रोहितच्या नावावर मोठा विक्रम

रोहितचे हे कसोटीत भारताचा कर्णधार म्हणून पहिलेच शतक आहे. त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतक करणारा भारताचा पहिलाच कर्णधार, तर जगातील एकूण तिसरा कर्णधार ठरला आहे. रोहितने वनडेत कर्णधार म्हणून 3 शतके आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 2 शतके केली आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 वे शतक

रोहितचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे नववे शतक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो सुनील गावसकरांना मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आला आहे. गावसकरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतके केली आहेत.

या यादीत 20 शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर 15 शतकांसह विराट कोहली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर 10 शतके आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com