IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस! मॅक्सवेल, झम्पाचे पुनरागमन, दुसऱ्या T20 साठी अशी आहे 'प्लेइंग - 11'

India vs Australia Playing XI: रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आहे.
India vs Australia | Matthew Wade - Suryakumar Yadav
India vs Australia | Matthew Wade - Suryakumar YadavICC
Published on
Updated on

India vs Australia, 2nd T20I Match at Thiruvananthapuram, Playing XI

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (26 नोव्हेंबर) खेळला जात आहे. हा सामना तिरुवनंतपुरमधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऍडम झम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल यांचे पुनरागमन झाले आहे. झम्पाला जेसन बेऱ्हेनडॉर्फच्या जागेवर आणि मॅक्सवेलला ऍरॉन हार्डीच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

India vs Australia | Matthew Wade - Suryakumar Yadav
Team India: वर्ल्डकपनंतर दोनच महिन्यात 'हा' संघ पुन्हा येणार भारत दौऱ्यावर, वेळापत्रक आले समोर

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळलेले ११ खेळाडूच या सामन्यातही भारताकडून खेळताना दिसणार आहेत.

भारताला आघाडीची, तर ऑस्ट्रेलियाला बरोबरीची संधी

या मालिकेतील पहिला सामना जिंकला असल्याने भारतीय संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून मालिकेतील आघाडी आणखी भक्कम करण्याची संधी भारताकडे असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

India vs Australia | Matthew Wade - Suryakumar Yadav
IND vs AUS: ऋतुराज डायमंड डकवर रनआऊट होताच स्टॉयनिसने उडवली जयस्वालची खिल्ली, पाहा Video

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा

  • ऑस्ट्रेलिया - स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक/कर्णधार), सीन ऍबॉट, नॅथन एलिस, ऍडम झम्पा, तन्वीर संघा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com