India vs Australia: नागपूरमध्ये रो'हिट'! शतक ठोकताच 'हा' रेकॉर्ड करणारा बनला पहिलाच भारतीय कर्णधार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी करत मोठा विक्रम केला आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे.

त्याने शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात 171 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह त्याचे शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील नववे शतक आहे. तसेच कसोटी कर्णधार म्हणून पहिलेच शतक आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma Video: आता चौथं द्विशतक... हिटमॅनने शतक करताच सूर्यकुमारच्या रिऍक्शनने वेधले लक्ष

त्यामुळे रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतक करणारा जगातील चौथाच कर्णधार ठरला आहे.

त्याच्यापूर्वी श्रीलंकेचा तिलकरत्ने दिल्शान, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांनी राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात किमान एक शतक करण्याचा कारनामा केला आहे.

रोहितने वनडेमध्ये भारताचे नेतृत्व करताना 3 शतके केली आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करताना 2 शतके केली आहेत. आता त्याने कर्णधार म्हणून कसोटीतही शतक केले आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: 'हिटमॅन'ची प्रतिक्षा संपली! तब्बल 1100 दिवसांनी सेंच्यूरी ठोकत साधली पाँटिंगची बरोबरी

दरम्यान, नागपूर कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 63.5 षटकात सर्वबाद 177 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या, तर भारताकडून या डावात रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहित आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात केली होती. रोहितने आक्रमक सुरुवात करताना पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात तीन चौकार मारले होते. या दोघांनी मिळून सलामीला 76 धावांची भागीदारी केली.

मात्र राहुल 20 धावांवर बाद झाला. दरम्यान, त्यानंतरही भारताची मधली फळी फार काही खास करू शकली नाही. एका बाजूने रोहितने डाव सांभाळला असला, तरी भारताने चेतेश्वर पुजारा (7) विराट कोहली (12), सूर्यकुमार यादव (8) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या.

तसेच पहिल्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेला आर अश्विनही दुसऱ्या दिवशी 23 धावा करून बाद झाला. तरी भारताने रोहितच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात आघाडी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com