IND vs AUS 1st ODI: ...अन् कॅप्टन हार्दिक अचानक भडकला! अंपायरबरोबर रागात बोलतानाचा Video आला समोर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजी करत असताना अचानक संतापला, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला केवळ 35.4 षटकात 188 धावांवर रोखले. पण या दरम्यान भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या एका क्षणी प्रचंड संतापलेला दिसला होता.

या सामन्यात भारताकडून दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने ट्रेविस हेडला 5 धावांवर बाद केले होते. पण त्यानंतर मिशेल मार्शला साथ देण्यासाठी स्टीव्ह स्मिथ मैदानात आला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्यास सुरुवात केली होती. त्यांनी काही चांगले आक्रमक शॉटही खेळले होते.

Hardik Pandya
IND vs AUS: वनडे क्रिकेटमध्ये भारत की ऑस्ट्रेलिया कोणाचं वर्चस्व? जाणून घ्या रेकॉर्ड्स

दरम्यान, मार्श आणि स्मिथ चांगली फलंदाजी करत असताना 6 व्या षटकात सिराज गोलंदाजीला आला. हे षटक सुरु असतानाच मध्येच स्मिथने सिराजने चेंडू टाकण्यासाठी रनअप घेतलेला असताना त्याला थांबवले. कारण त्याला साइट स्क्रिनच्या इथे काहीतरी अडथळा जाणवत होता. अखेर काही वेळाने सिराज पुन्हा गोलंदाजी करण्यास सज्ज झाला. यावेळी सिराज काहीसा निराश झाला होता.

त्यानंतर पुढच्या षटकात हार्दिक गोलंदाजीसाठी आला. पण या षटकातही तीच गोष्ट पाहायला मिळाली. त्याने या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेतला असताना स्ट्राईकवर असलेल्या मार्श मागे सरकला. त्यामुळे हार्दिकला गोलंदाजी टाकण्यापासून थांबावे लागले.

मार्शलाही साईट स्क्रिनच्या इथे होत असलेल्या हालचालींची समस्या जाणवल्याने त्याने हार्दिकला थांबवले. पण त्यानंतर हार्दिक पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी जाताना प्रचंड संतापला होता. तो पंच नितीन मेनन शीही काहीतरी चिडून बोलला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दरम्यान, हे स्पष्ट झाले नाही की हार्दिक नक्की साईट स्क्रिनजवळील प्रेक्षकांवर चिडला होता, की मार्शवर चिडला होता.

Hardik Pandya
IND vs AUS 1st ODI: जड्डू, गिल, केएलचे शानदार कॅच, तर शमी, सिराज गोलंदाजीत चमकले; पाहा Video

दरम्यान, या सामन्यात मार्शने आक्रमक फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. त्याने 10 चौकार आणि 5 षटकारांसह 65 चेंडूत 81 धावांची खेळी केली. पण तो आणि स्मिथ (22) बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. मार्शची विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ 59 धावांत पुढील 7 विकेट्स गमावल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांवरच संपला.

भारताकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com