टीम इंडियाचा पाकिस्तानला ODI Ranking मध्येही 'दे धक्का'! रोहितसेनेने पटकावले 'हे' स्थान

ICC Ranking: आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak

ICC ODI Team Ranking: आशिया चषक 2023 स्पर्धा सध्या सुरू असून या स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध सुपर फोरच्या सामन्यात अखेरच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हानही संपले आहे. तसेच पराभवाचा फटका आता त्यांना वनडे क्रमवारीतही बसला आहे.

काही दिवसांपूर्वीच वनडे क्रमवारीत पाकिस्तानने अव्वल क्रमांक पटकावला होता. मात्र, आशिया चषकात झालेल्या सलग दोन पराभवानंतर त्यांना हा अव्वल क्रमांक गमवावा लागला असून आता तर ते थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतीय संघाची आशिया चषकातील आत्तापर्यंतची कामगिरी चांगली राहिली असून 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच 1 सामना रद्द झाला होता.

India vs Pakistan
IND vs SL: भारत-श्रीलंका सामन्यानंतर चाहत्यांमध्येच जुंपली, हाणामारी करतानाचा Video व्हायरल

तिसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या पाकिस्तानचे सध्या 115 रेटिंग पाँइंट्स आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचे 116 रेटिंग पाँइंट्स आहेत.

पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांचीही दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्याचा फायदा त्यांना झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे सध्या 118 रेटिंग पाँइंट्स आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी शर्यत असणार आहे. भारताला १५ सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध आशिया चषकातील सुपर फोरचा अखेरचा सामना खेळायचा आहे, तर १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे.

India vs Pakistan
ICC Ranking: गिल, विराट, रोहित टॉप-10 मध्ये! तब्बल साडेचार वर्षांनी भारतीय संघाबाबत घडून आला 'हा' योग

तसेच ऑस्ट्रेलियालाही 15 आणि 17 सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा आणि पाचवा वनडे सामना खेळायचा आहे. त्यामुळे, जर भारताने दोन्ही सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला, तर भारतीय संघ अव्वल क्रमांक पटकावू शकतो.

तसेच भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलिया चौथा वनडे पराभूत झाले, तर लगेचच भारत अव्वल क्रमांकावर येऊ शकतो.

मात्र जर ऑस्ट्रेलियाने उर्वरित सामने जिंकले किंवा एकही सामना जिंकला, तर ते अव्वल स्थान भक्कम करू शकतात.

विशेष म्हणजे आशिया चषक स्पर्धा संपली की भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये 22 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या मालिकेतही ही शर्यत कायम राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com