ICC Ranking: गिल, विराट, रोहित टॉप-10 मध्ये! तब्बल साडेचार वर्षांनी भारतीय संघाबाबत घडून आला 'हा' योग

ICC ODI Ranking: आयसीसीने नुकतीच वनडे क्रमवारी जाहिर केली असून भारताचे तीन फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Shubman Gill, Virat Kohli and Rohit Sharma ICC ODI Ranking:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सध्या सुपर फोर फेरी सुरू आहे. याचदरम्यान आयसीसीने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंना फायदा झाल्याचे दिसले आहे.

आशिया चषकात भारताने आत्तापर्यंत पराभव स्विकारलेला नाही. तसेच भारताकडून विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा, कुलदीप यादव अशा खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रमवारीत त्यांना फायदा झाला आहे.

आशिया चषकात 2 अर्धशतके आत्तापर्यंत केलेल्या शुभमन गिल फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. त्याच्यापुढे आता केवळ पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे.

बाबर आझम आणि शुभमन गिल यांच्यात केवळ 103 रेटिंग पाँइंट्सचा फरक आहे. बाबर 863 रेटिंग पाँइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आणि गिल 759 रेटिंग पाँइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Team India
World Cup 2023: पंच अन् रेफ्रींची ICC ने केली घोषणा, जवागल श्रीनाथसह भारताच्या दोघांना संधी

याशिवाय फलंदाजांच्या यादीत विराट आणि रोहितलाही चांगलाच फायदा झाला आहे. रोहित पुन्हा पहिल्या 10 जणांमध्ये आला आहे. विराट आणि रोहित या दोघांनीही प्रत्येकी 2 स्थानांची प्रगती केली असून विराट आता 8 व्या क्रमांकावर आणि रोहित 9 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

त्यामुळे तब्बल साडेचार वर्षांनी वनडे क्रमवारीत पहिल्या 10 जणांमध्ये भारताचे तीन खेळाड आहेत. यापूर्वी 2019 च्या सुरुवातीला अखेरचे भारताचे तीन फलंदाज क्रमवारीत पहिल्या 10 जणांमध्ये होते. त्यावेळी शिखर धवन, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे फलंदाज पहिल्या 10 मध्ये होते.

तथापि, ताज्या क्रमवारीनुसार पहिल्या 10 फलंदाजांमध्ये पाकिस्तानचेही 3 खेळाडू आहेत. बाबर अव्वल क्रमांकावर आहे, तर इमाम उल हक एका स्थानाने घसरला असता तरी तो 5 व्या क्रमांकावर आहे. तसेच फखर जमान 3 स्थानांनी खाली घसरला असून 10 व्या क्रमांकावर आहे.

याशिवाय ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर एक स्थानाने प्रगती करत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

Team India
ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकून एश्ले गार्डनरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली क्रिकेटर

गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादवनेही प्रगती केली असून त्याने या आशिया चषकात 9 विकेट्स आत्तापर्यंत घेतल्या आहेत. त्यामुळे त्याने 5 स्थानांची प्रगती केली असून तो 7 व्या क्रमांकावर पोहचला आहे. गोलंदाजांच्या यादीत भारताचा मोहम्मद सिराजही पहिल्या 10 जणांमध्ये असून तो 9 व्या क्रमांकावर आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर जोश हेजलवूड अव्वल क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे गोलंदाज हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनाही फायदा झाला आहे. नसीमने 11 स्थांनाची प्रगती करत 51 वा क्रमांक मिळवला आहे. रौफने 8 स्थानांची झेप घेत 21 वा क्रमांक मिळवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com