U19 World Cup: सुरु होणार सेमीफायनलचा रोमांच! भारतासह 'हे' चार संघ विजेतेपदाच्या शर्यतीत; कुठे अन् कधी पाहणार मॅच?

U19 World Cup 2024 Semi-Final: 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. यात भारतीय युवा संघाचाही समावेश आहे.
U19 World Cup | Team India
U19 World Cup | Team IndiaX/ICC

U19 World Cup 2024 Semi-Final Schedule:

दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी आणि सुपर सिक्स फेरी 3 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत.

या स्पर्धेत एकून 16 संघ सहभागी झाले होते. यातून आता केवळ भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या चार 19 वर्षांखालील संघांचे आव्हान बाकी आहे. या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, उपांत्य फेरीतील पहिला सामना बेनोनीमधील विलोमोर पार्कमध्ये 6 फेब्रुवारी रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका या 19 वर्षांखालील संघात खेळवला जाणार आहे.

तसेच दुसरा सामना बेनोनीमध्येच 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात खेळवला जाणार आहे.

या दोन्ही सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीतील विजेते दोन संघ 11 फेब्रुवारीला अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावण्यासाठी आमने-सामने येतील. अंतिम सामना देखील बेनोनीलाच होणार आहे.

U19 World Cup | Team India
IND vs ENG: ...सिक्स, फोर अन् जयस्वालचं खणखणीत द्विशतक, टीममेट्सकडूनही खास कौतुक, पाहा Video

अशी राहिली संघांची कामगिरी

दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघाने साखळी फेरी आणि सुपर सिक्समधील मिळून सर्व 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत अपराजीत संघ म्हणून खेळणार आहे.

दरम्यान, भारताप्रमाणेच पाकिस्तान संघाने देखील साखळी फेरी आणि सुपर सिक्समधील मिळून सर्व 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते देखील या स्पर्धेत अपराजीत आहेत.

तसेच दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत दोन विजय आणि एक पराभव स्विकारला होता. तसेच त्यांनी सुपर सिक्समधीलही दोन्ही सामने जिंकले आहेत.

याशिवाय ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले, तसेच सुपर सिक्समधील त्यांनी एक सामना जिंकला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

कसे आणि कुठे पाहाणार सामने?

19 वर्षांखालील विश्वचषकातील उपांत्य फेरीचे सामने भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर दिसणार आहेत. तसेच डिज्नी + हॉटस्टार या ऍप आणि वेबसाईटवरही सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

U19 World Cup | Team India
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध 6 विकेट्स घेणाऱ्या बुमराहचा नवा विक्रम! ही कामगिरी करणारा पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज

वेळापत्रक -

  • उपांत्य फेरी

    • 6 फेब्रुवारी - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (वेळ - दुपारी 1.30 वाजता)

    • 8 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (वेळ - दुपारी 1.30 वाजता)

  • अंतिम सामना

    • 11 फेब्रुवारी (वेळ - दुपारी 1.30 वाजता)

असे आहेत संघ -

  • भारत - आर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयुर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अविनाश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इन्नेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गावडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

  • दक्षिण आफ्रिका - डेव्हिड टीगर, जॉन जेम्स (कर्णधार), मार्टिन खुमालो, ट्रिस्टन लुस, क्वेना माफाका, दिवान मारियास, रिले नॉर्टन, एनकोबानी मोकोएना, रोमाशन पिल्ले, सिफो पोट्सेन, ल्ह्यून-द्रे प्रिटोरियस, रिचर्ड सेलेट्सवेन, ऑलिव्हर व्हाइटहेड, स्टीव्ह स्टोल्क, एनटांडो झुमा

  • ऑस्ट्रेलिया - ह्यू वेबगेन (कर्णधार), लचलान एटकेन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, टॉम कॅम्पबेल, हॅरी डिक्सन, रायन हिक्स, सॅम कोन्स्टास, राफेल मॅकमिलन, एडन ओ'कॉनर, हरजस सिंग, टॉम स्ट्रेकर, कॅलम विडलर, ऑली पीक

  • पाकिस्तान - साद बेग (कर्णधार), अली अस्फंद, अली रझा, अहमद हसन, अमीर हसन, अरफत मिन्हास, अझान अवेस, हारून अर्शद, खुबैब खलील, मोहम्मद झीशान, नावेद अहमद खान, शाहजेब खान, शमील हुसेन, मुहम्मद रियाजुल्ला, उबेद शाह

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com