Asian Games: नेमबाजीत भारताचा डंका! सिफत कौरची सुवर्ण पदकासह विश्वविक्रमालाही गवसणी

Asian Games China: भारताच्या नेमबाजपटूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे.
Sift Kaur Samra, Ashi Chouksey and Qiongyue Zhang
Sift Kaur Samra, Ashi Chouksey and Qiongyue Zhang
Published on
Updated on

Sift Kaur Samra won gold medal in individual 50m rifle 3-position at Asian Games Hangzhou, China with world record:

चीनमधील होंगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरू आहे. या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी (बुधवार, २७ सप्टेंबर) भारताच्या नेमबाजपटूंनी प्रभावी कामगिरी केली आहे. भारताच्याच सिफत कौर समरा हिने विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे.

बुधवारी सिफतने ५० मीटर रायफल ३ पोसिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने ४६९.६ स्कोअर करत विश्वविक्रमालाही गवसणी घातली. महिला ५० मीटर रायफल ३ पोसिशन प्रकारातील हा सर्वोच्च स्कोअर आहे.

दरम्यान, याच प्रकारात भारताच्याच अशी चौक्सी हिने कांस्य पदक जिंकले. तिने ४५१.९ स्कोअर केला. चीनच्या क्यूआयनगे झांग हिने ४६२.३ स्कोअरसह रौप्य पदक जिंकले.

Sift Kaur Samra, Ashi Chouksey and Qiongyue Zhang
Asian Games Cricket: भारतीय महिलांनी जिंकलं ऐतिहासिक सुवर्ण पदक! फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

दरम्यान, सिफत आणि अशी यांचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. त्यांनी बुधवारीच महिला ५० मीटर रायफल ३ पोसिशन सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. हे रौप्य पदक मिळवणाऱ्या भारतीय संघात सिफत, अशी यांच्यासह मानिनी कौशिक हिचाही समावेश होता.

बुधवारी नेमबाजीमधीलच महिला २५ मीटर पिस्तुल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. या संघात मनू भाकर, इशा सिंग आणि रिदम सांगवान या तिघींचा समावेश होता. त्यांनी १७५९ स्कोअरसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच या प्रकारात चीनच्या संघाला रौप्य आणि दक्षिण कोरियाला कांस्य पदक मिळाले.

Sift Kaur Samra, Ashi Chouksey and Qiongyue Zhang
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका, 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत 'सुवर्ण' वेध!

त्याचबरोबर नेमबाजीत पुरुषांच्या स्किट प्रकारात भारतीय संघाने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. या संघात अंगद बाजवास गुरजोत खांगुरा आणि अनंकजीत सिंग यांचा समावेश होता.

तसेच बुधवारी सेलिंगमध्ये विष्णू सारवानन याने पुरुषांच्या आयएलसीए7 या प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com