Asian Games 2023: कबड्डीत भारतीय पुरुष संघाचा पाकिस्तानला धोबीपछाड! महिला संघही फायनलमध्ये

India Kabaddi Team: भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
Asian Games 2023 | India vs Pakistan Kabaddi
Asian Games 2023 | India vs Pakistan KabaddiDainik Gomantak
Published on
Updated on

India Men's and Women's Kabaddi Teams into the Final in 19th Asian Games Hangzhou: चीनमध्ये सुरू असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघाने दमदार कामगिरी बजावली आहे. भारताच्या दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश करत कमीत कमी रौप्य पदक पक्के केले आहे.

या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या कबड्डी संघांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. उपांत्य फेरीतही भारताच्या दोन्ही संघांनी एकतर्फी विजय मिळवले.

भारताचा पाकिस्तानविरुद्ध दमदार विजय

भारतीय पुरुष कबड्डी संघाचा उपांत्य सामना पाकिस्तानविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 61-14 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघ एकदाही ऑल-आऊट झाला नाही.

भारताच्या चढाईपटू आणि बचावपटूंनी चोख कामगिरी बजावली. त्यामुळे पाकिस्तानला चढाई आणि बचाव अशा दोन्ही क्षेत्रात भारताला आव्हान देता आले नाही.

Asian Games 2023 | India vs Pakistan Kabaddi
Asian Games: भारतासाठी 12 वा दिवस सोनेरी! तिरंदाजी अन् स्क्वॅशमध्येही मिळवलं विक्रमी गोल्ड मेडल

पाकिस्तानने सुरुवातीला चार पाँइंट्स मिळवत चांगली सुरुवात केलेली.पण नवीनने भारतासाठी पहिले आठ पाँइंट्स एकहाती मिळवताना पुनरागमन करून दिले.

त्यानंतर मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानला वरचढ होण्याची कोणतीही संधी दिली नाही. भारताकडून अस्लम इनामदार, विशाल भारद्वाज, सचिन यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर आता 7 ऑक्टोबर रोजी इराणविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना पाहाण्यासाठी कबड्डी चाहते उत्सुक असतील. कारण इराणनेही गेल्या काही वर्षात कबड्डीत चांगली कामगिरी केली आहे.

महिला संघही अंतिम सामन्यात

भारतीय महिला कबड्डी संघानेही शुक्रवारी उपांत्य सामन्यात नेपाळविरुद्ध 61-17 असा सहज विजय मिळवला. या सामन्यातही भारतीय संघ एकदाही ऑलआऊट झाला नाही.

Asian Games 2023 | India vs Pakistan Kabaddi
Asian Games: टीम इंडिया दिमाखात फायनलमध्ये! क्रिकेटमधील दुसऱ्या 'गोल्ड'पासून केवळ एक पाऊल दूर

भारतीय महिला संघाच्याही बचावपटू आणि चढाईपटूंनी आपापली जबाबदारी योग्यरितीने सांभाळताना नेपाळला वरचढ होऊ दिले नाही. भारतीय संघाने पहिला हाफ संपला तेव्हा 29-10 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही आपली लय कायम ठेवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

भारतीय महिला संघाचा अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी चायनिज तिपैईविरुद्ध होणार आहे.

13 व्या दिवशी भारताला 5 पदके

दरम्यान, कबड्डीशिवाय भारताला 13 व्या दिवशी अन्य खेळात पदके मिळाली आहेत. कुस्तीमध्ये सोनमने महिलांच्या 62 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

तसेच महिला रेगुमधील सेपाक टकरावमध्ये भारताला कांस्य पदक मिळाले. या क्रीडा प्रकारात हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे दुसरेच पदक आहे.

बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्याचबरोबर तिरंदाजीत रिकर्व प्रकारात भारतीय महिला संघाला कांस्य पदक मिळाले आहे, तर पुरुष संघाने रौप्य पदक जिंकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com