Rohit Sharma Meet Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी (16 मे) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना होत आहे. हा सामना लखनऊच्या घरच्या मैदानावर म्हणजेच भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. हा आयपीएल 2023 हंगामातील 63 वा सामना आहे.
दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यातील मैत्री दिसली आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी हे दोन खेळाडूंच्या भेटीचा व्हिडिओ लखनऊने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसले की सामन्यापूर्वी रोहित आणि गंभीर एकमेकांना मैदानात भेटले, यावेळी या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर हे दोघेही गप्पा मारताना दिसले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यानंतर गंभीर आणि बेंगलोरचा फलंदाज विराट कोहलीमध्ये मोठे भांडण झाले होते. त्यानंतर या दोघांवरही बीसीसीआयने कारवाई करताना सामनाशुल्काच्या 100 टक्के दंडही लावला होता.
त्यामुळे रोहित आणि गंभीरच्या भेटीच्या व्हिडिओवर कमेंट करताना अनेक चाहत्यांनी विराटचाही संदर्भ जोडत मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, मुंबई आणि लखनऊ संघात मंगळवारी होत असलेला सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे. हे दोन्ही संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आहे. याच शर्यतीतील आपले स्थान आणखी भक्कम करण्यासाठी दोन्ही संघांचा विजयासाठी प्रयत्न असणार आहे. कारण या सामन्यात पराभव झाल्यास पुढील मार्ग कठीण होणार आहेत.
या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, आकाश मधवाल
लखनऊ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, प्रेरक मंकड, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.