India vs Australia Hockey: ऑस्ट्रेलियाच्या सलग 5 गोलने भारताचा पराभव, मालिकाही गमावली

भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चौथ्या सामन्यात यजमानांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
India Vs Australia Hockey
India Vs Australia HockeyDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia Hockey: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय हॉकी संघाला 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात यजमानांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ऍडलेडमधील मेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5-1 गोलफरकाने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडीही घेतली आहे.

India Vs Australia Hockey
Argentina vs Australia: मेस्सीचा 1000 व्या सामन्यात गोल अन् अर्जेंटिनाची क्वार्टर-फायनलमध्ये धडक

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून (Australia) जेरेमी हेवर्डने (29', 41') दोन गोल केले. तर जॅक व्हेटन (30'), टॉम विकहॅम (34'), मॅट डॉवसन (54') यांनी प्रत्येकी १ गोल केला. तसेच भारताकडून दिलप्रीत सिंग (25') याने एकमेव गोल केला.

या सामन्यात भारताकडून चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नव्हता. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीतने 25 व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिलेली. मात्र, ही आघाडी भारताला फार वेळ टिकवता आली नाही.

भारताच्या पहिल्या गोलनंतर ऑस्ट्रेलियाने त्यांची गती वाढवली आणि 29 व्या मिनिटाला हेवर्डने, तर 30 व्या मिनिटाला व्हेटनने गोल करत ऑस्ट्रेलियाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पण, त्यानंतरही भारताने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑस्ट्रेलियाचा बचाव खूपच भक्कम भासला, त्यांना भेदने भारताच्या (India Hockey Team) खेळाडूंना कठीण गेले.

India Vs Australia Hockey
India vs Australia Hockey: निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारताची बाजी, मालिकेतील आव्हानही कायम

त्यानंतरही ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या क्वार्टरमध्ये विकहॅमने 34 व्या मिनटाला गोल केला, तर हेवर्डने 41 व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियासाठी चौथा आणि त्याचा सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. अखेरच्या क्वार्टरमध्ये डॉवसनने 54 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियासाठी 5वा गोल नोंदवला. त्यानंतर भारतीय संघाला पुनरागमन करणे कठीण गेले. आता या मालिकेतील अखेरचा सामना 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com