Virender Sehwag Offer Help: सेहवागने ओडिशा रेल्वे दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या मुलांसाठी दाखवले औदार्य, करणार 'ही' मदत

विरेंद्र सेहवागने ओडिशातील रेल्वे अपघातात जीव गमावलेल्यांच्या मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Virender Sehwag | Odisha Train Accident
Virender Sehwag | Odisha Train Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

Virender Sehwag Offer Help to Odisha train Accident Victims children: शुक्रवारी (2 जून) ओडिशामध्ये झालेल्या गंभीर रेल्वे अपघाताने सारा भारत देश हादरला होता. या अपघातानंतर भारतातूनच नाही, तर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. जगभरातील अनेक राजकिय नेते, सेलिब्रेटी, खेळाडू, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही शोक व्यक्त केला आहे.

याचदरम्यान आता भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही दु:ख व्यक्त करताना मदतीचा हातही पुढे केला आहे. त्याने या अपघातात जीव गमावलेल्यांच्या मुलांसाठी मदत देऊ केली आहे.

Virender Sehwag | Odisha Train Accident
Odisha Train Accident: ब्रिटनविरुद्धच्या मॅचपूर्वी अपघातग्रस्तांसाठी भारतीय हॉकी टीमचं मौन, ध्वजही अर्ध्यावर फडकवला

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांचा एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला. या अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे.

सध्या समोर आलेल्या आकड्यांनुसार या अपघातात मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, 1000 हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा गेल्या 15 ते 20 वर्षांतील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.

Virender Sehwag | Odisha Train Accident
Gautam Adani on Odisha Accident : ओडिशा दुर्घटनेनंतर गौतम अदाणी यांचा मोठा निर्णय; अदाणी समूह करणार हे काम...

त्यामुळे या अपघातात झालेले नुकसान पाहाता विरेंद्र सेहवागने अपघाताचा एक फोटो ट्वीट करत लिहिले आहे की 'हा फोटो आपल्याला दीर्घकाळापर्यंत व्यथित करेल. दु:खाच्या या परिस्थितीत मी कमीत कमी एवढे, तर करू शकतो की या अपघातात जीव गमावलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेईल. मी या मुलांना सेहवाग इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये मोफत शिक्षणाची ऑफर देतो.'

'मी त्या सर्व शूर स्त्री आणि पुरुषांना सलाम करतो ज्यांनी या बचाव कार्यात आघाडीवर होते. तसेच स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या वैद्यकीय पथकाला आणि स्वयंसेवकांनाही सलाम. आपण सर्व या परिस्थिती एकत्र आहोत.'

दरम्यान, यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण अशा अनेक क्रिकेटपटूंनीही याबद्दल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच सेहवागप्रमाणेच उद्योगपती गौतम अदानी यांनीही या अपघातात जीव गमावलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com