Goa: धेंपो क्लब अकादमी प्रशिक्षणार्थींचे शैक्षणिक यश

यंदा या अकादमीतील सात जण बारावी इयत्तेत होते. त्यापैकी दोघे जण विशेष श्रेणीत, एक जण प्रथम श्रेणीत, तर चौघे जण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले
Trainee from Dhempo Sports Club Football Academy.T
Trainee from Dhempo Sports Club Football Academy.TDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीः मागील सलग तीन वर्षे धेंपो स्पोर्टस क्लब फुटबॉल अकादमीतील (Dempo Sports Club Football Academy) प्रशिक्षणार्थींनी दहावीच्या (SSC Goa Board Examinations) परीक्षेत शंभर टक्के उत्तीर्ण यश मिळविले, यंदा बारावीत असलेल्या पहिल्या तुकडीनेही शंभर टक्के निकाल नोंदविला. यंदा या अकादमीतील सात जण बारावी (HSSC 2021 Goa Board Examinations) इयत्तेत होते. त्यापैकी दोघे जण विशेष श्रेणीत, एक जण प्रथम श्रेणीत, तर चौघे जण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

Trainee from Dhempo Sports Club Football Academy.T
गोव्यातील फुटबॉलपटूंना रोजगाराची संधी

ॲलरिको कार्दोझ याने 85 टक्के गुण मिळवून विशेष श्रेणी यश मिळविले. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशात धेंपो महाविद्यालय शिक्षक वर्ग व रेखा डिसिल्वा यांचे मोलाचे योगदान आहे, असे धेंपो स्पोर्टस क्लबने नमूद केले आहे. ‘‘2017 साली अकादमीची सुरवात झाली, तेव्हा प्रशिक्षणार्थी फुटबॉल आणि शिक्षणात सर्वोत्तम ठरावेत याबाबत भाष्य केले होते. धेंपो समूहासाठी शिक्षण सदैव महत्त्वपूर्ण आहे. क्रीडा अकादमीत शिक्षण यशस्वीपणे सामावल्याचा खूप आनंद असून ही अभिमानाची भावना आहे. प्रशिक्षणार्थी, पालक, प्रशिक्षक आणि अध्यापक वर्गाचे अभिनंदन करत असून मुलं भविष्यातील कारकिर्दीत त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात आणखी प्रगती साधतील अशी आशा बाळगतो,’’ असे धेंपो समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे (Shrinivas Dempo) यांनी सांगितले.

Trainee from Dhempo Sports Club Football Academy.T
Ronaldinho, the legend: 41 व्या वर्षातही फुटबॉलच्या मैदानावरची जादु कायम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com