SAFF Women's Championship: फातोर्डा येथे भारताला तब्बल 27 वर्षांनंतर 'करंडक' ,सॅफ स्पर्धेत 1999 मध्ये पुरुष संघाने, तर यंदा महिलांनी पटकावले विजेतेपद

SAFF Women's Championship 2026 Final: यापूर्वी एप्रिल-मे १९९९ मध्ये फातोर्ड्यात झालेल्या पुरुषांच्या सॅफ स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते.
SAFF Women's Championship 2026 Final
SAFF Women's ChampionshipDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या सॅफ स्पर्धेत गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर तब्बल २७ वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा विजेतेपदाचा करंडक उंचावला. दोन्ही वेळेस यजमान पुरुष व महिला संघाने बांगलादेशलाच नमविले.

यापूर्वी एप्रिल-मे १९९९ मध्ये फातोर्ड्यात झालेल्या पुरुषांच्या सॅफ स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते. तेव्हा भारताने ब्रुनो कुतिन्हो व बायचुंग कुतिन्हो यांच्या गोलमुळे बांगलादेशला २-० फरकाने पराभूत केले होते. आता मे-जूनमध्ये झालेल्या महिलांच्या सॅफ स्पर्धेत बांगलादेशलाच ३-१ असे नमवून सात वर्षांनंतर भारतीय संघ महिलांच्या सॅफ स्पर्धेत विजेता ठरला.

SAFF Women's Championship 2026 Final
Goa Sport: स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी; बीसीसीआयच्या मोहाली येथील ‘सीओई’ शिबिरासाठी प्रशिक्षकपदी नियुक्ती

सहाव्यांदा विजेतेपद मिळविताना भारतीय महिलांनी घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा विजेतेपदास गवसणी घातली. यापूर्वी २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे बांगलादेशला ३-१ असे हरवून भारतीय महिलांनी अंतिम लढत जिंकली होती.

यावेळच्या सॅफ महिला स्पर्धेत भारतीय संघाने चार सामन्यांत १८ गोल नोंदविले, तर फक्त एक गोल स्वीकारला. २५ मे रोजी मालदीवविरुद्ध नोंदविलेला ११-० हा सर्वांत मोठा, तर उपांत्य लढतीत भूतानविरुद्धचा १-० हा निसटता विजय ठरला. साखळी फेरीत व अंतिम लढतीत बांगलादेशला अनुक्रमे ३-० व ३-१ अशी मात देत वर्चस्व राखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com