Women’s T20 World Cup: महिला T20 विश्वचषकात भारताचा सलग दुसरा विजय, वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा

India vs West indies: महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर भारताने गटात दुसरे स्थान कायम राखले आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs West indies, Women’s T20 World Cup: महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर भारताने गटात दुसरे स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिज सलग दुसरा सामना हरला आहे. संघासाठी उपांत्य फेरीची शर्यत कठीण झाली आहे.

भारताविरुद्ध (India) प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सहा गडी गमावून 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला.

दरम्यान, वेस्ट इंडिजने (West Indies) दिलेल्या 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दमदार झाली. मानधना आणि शफाली यांनी पहिल्या दोन षटकात 6 चौकार मारले. जरी मानधाना 7 चेंडूत 10 धावा करुन बाद झाली. पुढच्याच षटकात जेमिमाह रॉड्रिग्स अवघी एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतली.

शफाली वर्माही आठव्या षटकात 23 चेंडूंत 28 धावा काढून बाद झाली. यानंतर हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

Team India
Women's T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधारच आऊट!

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पूजा वस्त्राकरने ऋचा घोषकरवी झेलबाद करुन कर्णधार हेली मॅथ्यूजची दोन धावांची खेळी संपुष्टात आणली. या यशानंतर भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही.

कॅम्पबेल आणि टेलरने पाचव्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या राजेश्वरी गायकवाडचा दबाव कमी केला. पॉवरप्लेनंतर संघाची धावसंख्या एका विकेटवर 29 धावा होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com