Yashasvi Jaiswal - Virat Kohli: जयस्वालसाठी विराटची कोचिंग! बॅटिंग टिप्स देतानाचा व्हिडिओ व्हायरल

Video: वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना विराट कोहली यशस्वी जयस्वालला बॅटिंग टिप्स देताना दिसला.
Yashasvi Jaiswal - Virat Kohli
Yashasvi Jaiswal - Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli giving Batting tips to Yashasvi Jaiswal: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारताला या वेस्ट इंडिज दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, सध्या भारतीय संघ बार्बाडोसमध्ये जोरदार सराव करत आहे. भारताने २ दिवसीय सराव सामनाही खेळला. या दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल देखील आहे.

जयस्वालची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे तोही आपले कौशल्य दाखवण्यासाठी उत्सुक आहे. याचदरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जयस्वालबरोबर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की विराट जयस्वालला फलंदाजीबद्दल मार्गदर्शन करत आहे. त्याचे सल्ले जयस्वालही मनापासून ऐकत आहे.

Yashasvi Jaiswal - Virat Kohli
Ishant Sharma on Virat Kohli: 'विराटप्रमाणे माझ्याबरोबर तसं घडलं असतं, तर मैदानावरच गेलो नसतो...', इशांतने सांगितली आठवण

विराट भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 498 सामने खेळताना 25385 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 75 शतकांचा (आकडेवारी 6 जुलै 2023 पर्यंत) समावेश आहे.

दरम्यान, जयस्वालची मात्र नुकतीच सुरुवात झाली आहे. अद्याप त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण व्हायचे आहे. पण सध्या चर्चा आहे की त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजाराच्या जागेवर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. त्यामुळे जर संधी मिळाली, तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी कामगिरी करणार याकडे अनेकांचे लक्ष असेल.

कसोटी आणि टी20 मालिकांसाठी संधी

जयस्वालला वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी आणि टी20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. पण त्याला वनडे मालिकेसाठी मात्र संधी मिळालेली नाही.

अशा होणार मालिका

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

Yashasvi Jaiswal - Virat Kohli
Yashasvi Jaiswal: टीम इंडियातील निवडीनंतर जयस्वालची आली प्रतिक्रिया; म्हणाला, 'वडिलांना सांगितलं तेव्हा...'

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ -

  • भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

  • भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

  • भारताचा टी20 संघ - इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com