India captain Rohit Sharma receive three traffic challans:
भारतीय संघ सध्या वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेत भारताचा चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध गुरुवारी होत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माला मोठा दंड झाला आहे.
पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार रोहितला ट्रॅफिक पोलिसांकडून अतिरिक्त गती राखल्याबद्दल ३ चलन कापण्यात आले आहेत.
तो बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात सामील होण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून जात असताना त्याच्या कारचा स्पीड साधारण २१५ ताशी किमी होता. तो त्याची लँबोर्घिनी कार चालवत होता. त्याच्या अधिर स्पीडने कार चालवण्यामुळे त्याला आता दंड भरावा लागणार आहे.
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार ट्रॅफीक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की रोहितने हाय-वेवर ज्या स्पीडने गाडी चालवली, त्यासाठी त्यांना काळजी वाटत आहे. तसेच त्यांनी असेही सुचवले की त्याने पोलीस सुरक्षा असलेल्या संघाच्या बसने प्रवास करावा.
दरम्यान, रोहित वर्ल्डकप 2023 स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद झाला होता, पण त्यानंतर त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली आहे. तसेच पाकिस्तानविरुद्ध त्याने 86 धावांची खेळी केली.
तसेच भारताच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर भारताने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी तीन सामने खेळले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफागाणिस्तान आणि पाकिस्तान या संघांविरुद्ध सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला होता, तर अफगाणिस्तानविरुद्ध 8 विकेट्सने आणि पाकिस्तानविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.