Look at Rohit Sharma's powerful performance in the ODI World Cup through statistics:
विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे.
भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची खेळी करत पाकिस्तानी गोलंदाजांना झोडपून काढले. भारताच्या पहिल्या दोन विकेट्स झटपट पडल्यानंतरही रोहितने आपली आक्रमक फलंदाजी कायम राखत विजयाचा पाया भक्कम केला.
आपला तिसरा वर्ल्डकप खेळत असलेल्या रोहितने आतापर्यंत दमदाक कामगिरी केली आहे. तसेच वर्ल्डकपमध्ये 7 शतके करत आपला दर्जाही दाखवून दिला आहे.
असे असले तरी रोहितची ही कामगिरी सांगत आहे की, तो एकदा खेळपट्टीवर टिकला की तो नक्की मोठी खेळी करतोच.
रोहित शर्माने आतापर्यंत तीन वर्ल्डकपमधील 20 सामन्यांतील 20 डावांत 66.38 ची सरसरी आणि 101.96 च्या स्ट्राइक रेटने 1195 धावा केल्या आहेत.
रोहितने फलंदाजी केलेल्या 20 डावांत फक्त 5 वेळाच एकेरी धावसंख्या केली आहे. इतर 15 डावांत त्याने 7 शतके ठोकली आहेत. तर 4 अर्धशतके केली आहेत.
या आकडेवारीवरुन स्पष्ट होते की, जर रोहितने एकदा खेळपट्टीवर जम बसवाला की, तो हमखास मोठी खेळी करतो.
आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतासमोर 192 धावांचे आव्हान असताना सलामीवीर शुभमन गिल आणि अनुभवी विराट कोहली झटपट बाद झाले. मात्र, सुरुवातीपासूनच रोहितने आपला आक्रमकपणा कमी होऊ दिला नाही.
त्याने आपल्या 86 धावांच्या खेळीत शाहिन आफ्रिदी, हरिस राऊफ आणि हसन अली या पाकिस्तानच्या तिकडीला झोडपत 6 षट्कार आणि तितक्याच चौकारांची आतषबाजी केली.
या सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव करत भारताने वर्ल्डकमधील तिसरा विजय नोंदवला आहे.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 191 धावांत गुंडाळला.
यानंतर रोहित आणि श्रेयसच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.
पाकिस्तानकडून बाबर आझमने 50 आणि रिझवानने 49 धावा केल्या. भारताच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी रोहितने भारताकडून ८६ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीनने दोन गडी बाद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.