Olympic: छंद हे माणसाला जगण्याचा अर्थ देतात. मी का जगतोय?

किती ही कठीण समस्या आली तरी विचलित न होता आपलं कर्तव्य (Duties)प्रामाणिक मेहनत (Hard work)घेऊन पार पाडत राहिलं पाहिजे. त्यावेळी मनःस्थितीचा तोल जाता कामा नये. इतकं सांभाळलं की यश (Success)पायीच आहे यात तसूभरही शंका उरत नाही.
गोल्ड मेडल जिंकणारा ब्रिटिश ऍथलीट टॉम डेली विणकाम करताना
गोल्ड मेडल जिंकणारा ब्रिटिश ऍथलीट टॉम डेली विणकाम करताना Dainik Gomantak
Published on
Updated on

ऑलिम्पिक (Olympics)मध्ये पोहण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल (Gold medal)जिंकणारा जागतिक दर्जाचा ब्रिटिश ऍथलीट टॉम डेली (British athlete Tom Daly)पुन्हा आपला छंद जपत लोकांचे मन जिंकले. ऑगस्ट मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये एक दर्शनीय घटना घडली जिने जगाचा स्पोर्ट्सकडे स्त्री व पुरुष या भेदाने पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला.

27 वर्षीय टॉम जगातील प्रथम क्रमांकावर (Number One )आलेला ब्रिटिश गोताखोर आहे हे त्याने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून स्वतःला सिद्ध केले आहे. पण ज्यावेळी तो त्याचा पहिला राउंड संपवून विंगेत बसलेला होता त्यावेळी त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेत तो विणकाम करतांना दिसून आला. त्याचा फोटो व्हायरल झाला त्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा (Appreciation)वर्षावास सुरुवात झाली. पण आपल्या मनात येत असेल की ह्यात इतकं विशेष काय? विणकाम करणं काय कठीण आहे? कुणीही करू शकेल. पण तसे नाही.

गोल्ड मेडल जिंकणारा ब्रिटिश ऍथलीट टॉम डेली विणकाम करताना
स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सोनू सुदची भारताचा ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड

आपल्याकडे बऱ्याच गोष्टी पुरुषी आणि स्त्रीत्व ह्या नजरेने पहिल्या जातात. जसे आई होणे हे स्त्री च अनुभवू शकते पण मातृत्व ही भावना आहे ती कुणीही अनुभवू शकतं. त्याप्रमाणे विणकाम हे प्रामुख्याने स्रियांचे काम मानले जाते पण पाश्चात्य देशांत (western countries)तसा फरक केला जात नाही. कलेला मग ते डान्स असो, चित्र असो, रांगोळी असो किंवा काही ही असो लैंगिकतेशी जोडता येत नाही हे सिद्ध करणारी ही एक मोठी घटना घडली. एक एथलिट, तो ही पुरुष आणि विणकाम करतोय हे आपल्या भारतीय दृष्टीला पचविण्यास थोडं जड जाणारं होतं.

दुसरं कारण असं, की टॉम ज्यावेळी हे विणकाम (Knitting)करत होता त्यावेळी तो ऑलिम्पिक सारख्या जगातल्या सर्वात मोठ्या स्पर्धेत आपलं कौशल्य सिद्ध करत होता. आपण साधी परीक्षा देतो त्यावेळी सुद्धा हातापायाला घाम येतो. पण त्याने हे करून सिद्ध केले की मनःस्थिती जर स्थिर असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. एकाग्रता, बुद्धिमत्ता, शारीरिक व मानसिक कौशल्य(Concentration, intelligence, physical and mental skills) हे स्थिर वृत्ती असल्या शिवाय सिद्ध होत नाही.

महर्षी पतंजलींनी (Maharshi Patanjali)पतंजली योगसूत्र ह्या ग्रंथात ह्या मनःस्थिती ला चित्तवृत्तीनिरोध म्हटले आहे. गीतेत भगवान श्रीकृष्ण त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणतात. तर टॉम ऐवजी दुसरं कुणी असतं तर त्यावेळी आणखीन लास्ट मिनिट प्रॅक्टिस केली असती किंवा स्टॅमिना बुस्ट केला असता किंवा इतरांचं प्रदर्शन (Performance)पहात आरामात बसला असता. पण त्याने अशा अटीतटीच्या वेळी निवडला छंद. छंद हे माणसाला जगण्याचा अर्थ देतात. मी का जगतोय? ह्याचं उत्तर आपला छंद असते. प्रत्येक व्यक्तीच्या दोन जीविका असतात एक उपजीविका आणि दुसरी मुख्यजीविका. उपजीविका आपल्याला पोट भरण्यासाठी मदत करते तर मुख्यजीविका आपल्याला आपण का जगतोय ?

गोल्ड मेडल जिंकणारा ब्रिटिश ऍथलीट टॉम डेली विणकाम करताना
ऑलिम्पिक विजेत्यांचा BCCI करणार सन्मान, कोट्यवधींचा वर्षाव

त्याचा अर्थ गवसण्यासाठी मदत करते. छंदातुन आपल्याला आपली मुख्यजीविका समजू शकते. सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar,), ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर(Gyan Samrajni Lata Mangeshkar), बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare)ही काही अशी उदाहरणे ज्यांची उपजीविका व मुख्यजीविका एकच होती म्हणून त्यांनी एकमेवाद्वितीय यश संपादन केलं. टॉम ने अशा अतिशय तणाव असलेल्या वेळी मनःस्थिती शांत व संयमी ठेवण्यासाठी छंद वापरला आणि त्यात गुंतला त्यामुळे त्याची एकाग्रता अखंड राहिली आणि मनःस्थिती ही डिस्टर्ब झाली नाही ज्यामुळे खेळात त्याचे शानदार प्रदर्शन झाले. हे झालं तिसरं कारण.

चौथं कारण म्हणजे लोक काय म्हणतील याचा किंचित ही विचार त्याने तिथे केला नाही. त्या ऐवजी तो जर भारतात असता तर अरे विणकामाच्या सुया, लोकरीचे बंडल घेऊन इथे काय करतो, टोपडी विणायला बसलाय का ? असं खोचक बोलणं त्याला ऐकावं लागलं असतं. किंवा पब्लिसिटी स्टंट म्हणून दुर्लक्ष केलं असतं. पण त्याच्या मनात peace of mind is on high priority हे ठासलेलं असल्याने कोण काय बोलेल याचा त्याला लवलेशही नव्हता.

गोल्ड मेडल जिंकणारा ब्रिटिश ऍथलीट टॉम डेली विणकाम करताना
स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सोनू सुदची भारताचा ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड

'कुछ तो लोग कहेंगे,

लोगो का काम है केहना,

छोडो बेकार की बातों मे,

कही बित ना जाये रैना....'

खरंच हे गाणं तो प्रत्यक्ष त्याक्षणी जगला.

यात विशेष असण्याचं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे आत्मविश्वास(Confidence). हा फोटो काढला त्यावेळी टॉम ची स्पर्धा संपलेली नव्हती. परंतु हा फोटो व्हायरल झाला त्यावेळी तो सुवर्णपदक जिंकला होता. जिंकल्यावर जेव्हा त्याची प्रतिक्रिया घेण्यात आली आणि त्याला विणकामाच्या बाबतीत विचारलं तेव्हा तो सहजरित्या हसत बोलला की मी माझं ऑलिम्पिक गोल्ड मेडल ठेवण्यासाठी एक लोकरीची छोटी पर्स विणत होतो. आणि पठ्ठ्याने तोपर्यंत ती पर्स पुर्ण करून त्यात मेडल ठेवून त्याचा फोटो ही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. याला त्याच्या आत्मविश्वास म्हणावा!

गोल्ड मेडल जिंकणारा ब्रिटिश ऍथलीट टॉम डेली विणकाम करताना
भारताकडे ऑलिम्पिक पदक जिंकण्याची भूक कमी, चीनचा दावा

ह्यावरून असं कळतं की त्याचा चित्तवृत्तीनिरोध इतका दृढ होता तर त्याला हे यश मिळवनं इतकं कठीण वाटलंच नव्हतं. कारण त्याला माहित होतं की त्याचे परिश्रम अद्वितीय होते म्हणून यश देखील एकमेवाद्वितीयच मिळेल याची त्याच्या मनात खात्री होती म्हणून तो इतक्या आत्मविश्वासाने असं बोलू शकला.

ही घटना आणि हा क्षण अविस्मरणीय असून आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातो. किती ही कठीण समस्या आली तरी विचलित न होता आपलं कर्तव्य प्रामाणिक मेहनत घेऊन पार पाडत राहिलं पाहिजे. त्यावेळी मनःस्थितीचा तोल जाता कामा नये. इतकं सांभाळलं की यश पायीच आहे यात तसूभरही शंका उरत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com