IND vs AUS: तिसऱ्या T20 मध्ये भारत रचणार इतिहास? पाकिस्तानला मागे टाकत 'नंबर वन' टीम बनण्याची सुवर्णसंधी

Team India Record: गुवाहाटीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकून भारताला पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.
India vs Australia | 3rd T20I
India vs Australia | 3rd T20IBCCI
Published on
Updated on

India Can Break Pakistan world record:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत, त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवरही आहे.

आता तिसरा सामना गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर होणार असून या सामन्यात भारताला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

भारताने जर हा सामना जिंकला, तर भारत ही टी20 मालिका खिशात तर घालेनच, पण त्याचबरोबर पाकिस्तानचा मोठा विश्वविक्रमही मोडेल.

भारताने जर हा सामना जिंकला, तर हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 136 वा विजय ठरेल. त्यामुळे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरेल.

India vs Australia | 3rd T20I
Team India: वर्ल्डकपनंतर दोनच महिन्यात 'हा' संघ पुन्हा येणार भारत दौऱ्यावर, वेळापत्रक आले समोर

सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर भारत आणि पाकिस्तान आहेत. या दोन्ही संघांनी 135 विजय मिळवले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताने आत्तापर्यंत 211 सामने खेळले असून 135 सामने जिंकले आहेत, तसेच 66 सामने पराभूत झाले आहेत. तसेच पाकिस्तानने 226 सामने खेळले असून 135 सामने जिंकले आहे. तसेच 82 सामने पराभूत झाले आहेत.

India vs Australia | 3rd T20I
World Cup 2023: 'ऑस्ट्रेलियाने फसवलं...', कमिन्सने पहिली बॉलिंग घेण्यामागच्या कारणाचा अश्विनकडून खुलासा

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून त्यांनी 200 टी20 सामन्यांमधील 102 सामन्यांत विजय मिळवले आहेत, तर 83 सामन्यात पराभव स्विकारला आहे. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या तीन संघांनाच 100 हून अधिक विजय मिळवता आले आहेत.

  • आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ (आकडेवारी 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत) -

    • 135 विजय - भारत (211 सामने)

    • 135 विजय - पाकिस्तान (226 सामने)

    • 102 विजय - न्यूझीलंड (200 सामने)

    • 95 विजय - दक्षिण आफ्रिका (171 सामने)

    • 94 विजय - ऑस्ट्रेलिया (179 सामने)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com