T20WC: भारत इन, आफ्रिका आऊट! नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेला चकवा

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामना होण्याआधीच भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे.
T20 World Cup 2022
T20 World Cup 2022Dainik Gomantak

T20 World Cup: नेदरलँडचा दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (ICC T20 World Cup 2022) समीकरणं बदलली आहेत. नेदरलँड संघाने (Netherlands) दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) विजय मिळवला असून, टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी भारत इन तर, आफ्रिका आऊट झाली आहे. नेदरलँडने 20 षटकांत 158 धावा केल्या. आफ्रिकेला ही धावसंख्या पार करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत केवळ 145 धावा करता आल्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामना होण्याआधीच भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे.

T20 World Cup 2022
T20 WC 2022: श्रीलंकेच्या क्रिकेटर दानुष्का गुनाथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक, बलात्काराचा आरोप

नेदरलँडकडून पराभव झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा फायदा पाकिस्तान आणि बांगलादेशला (Pakistan And Bangladesh) होईल. या दोघांमधील पुढील सामन्यातील विजेत्याला उपांत्य फेरीत स्थान मिळेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिका बाहेर पडल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये उपांत्य फेरीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणा आहे. दुसरीकडे आफ्रिकेच्या पराभवामुळे भारत हा पात्र ठरणारा पहिला संघ आहे.

भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात रविवारी टी-20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना मेलबर्न क्रिकेटच्या ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. त्यापूर्वीच नेदरलँड्सनं जाताजाता भारतीय संघाला मोठं ‘गिफ्ट’ दिलं आहे. विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या गटामधून न्यूझीलंड आणि इंग्लडचे संघ पात्र ठरले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com