'प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल', राज ठाकरेंची फडणवीस, गडकरींच्या बालेकिल्ल्यात राजगर्जना

मी आणि माझा पक्ष आजही अखंड महाराष्ट्राच्या बाजूने आहे.
'प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल', राज ठाकरेंची फडणवीस, गडकरींच्या बालेकिल्ल्यात राजगर्जना
Published on
Updated on

कोरोना आणि वैद्यकीय कारणामुळे अनेक दिवस घराबाहेर न पडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Tackeray) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात नागपूर आणि विदर्भातून (Nagpur / Vidarbh) केली. ठाकरे यांनी येथील पक्षबांधणीचा आढावा घेतला. गेल्या 16 वर्षात अपेक्षित संघटनात्मक बांधणी झाली नाही. त्यामुळे नवीन तरुण-तरुणींना संधी द्यायचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. नागपूरमधली सध्याची कार्यकारिणी रद्द करण्यात आली असून, नवीन कार्यकारिणीची घोषणा घटस्थापनेवेळी केली जाईल. अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.

प्रस्थापितांच्या विरोधात लढूनच तुम्ही मोठे होता

राज ठाकरे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, 'प्रस्थापितांच्या विरोधात लढूनच तुम्ही मोठे होता. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, भाजपने अनेक वर्ष प्रस्थापितांच्या विरोधात लढून मुसंडी मारली. उद्या जर विदर्भात पक्ष रुजवायचा असेल तर इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल.' असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.

'राजकीय संघर्ष करताना व्यक्तिगत संबंध आणि राजकीय भूमिका ह्यात गल्लत करू नका. राजकारणात विरोध हा मुद्द्यांना असतो, व्यक्तीला नसतो. त्यामुळे ह्यात कोणी गल्लत करू नये.' असे ही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

'प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल', राज ठाकरेंची फडणवीस, गडकरींच्या बालेकिल्ल्यात राजगर्जना
Mandrem Panchayat: मांद्रे ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव संमत

वेदांता-फॉक्सकॉन

महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गेलाच कसा? ह्यात कोणी पैसे मागितले किंवा कोणाचे व्यक्तिगत हेतू साध्य झाले नाहीत म्हणून हे घडलं का, ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली.

मी आणि माझा पक्ष आजही अखंड महाराष्ट्राच्या बाजूने

स्वतंत्र विदर्भाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'मी आणि माझा पक्ष आजही अखंड महाराष्ट्राच्या बाजूने आहे. पण स्वतंत्र विदर्भाबद्दल जनमत जाणून घ्यायचं असेल तर जसं ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटसाठी जनमत घेतलं गेलं तसा अधिकृत जनमताचा कौल घ्या. जनमत ज्या बाजूने असेल तोच अंतिम निर्णय असायला हवा.' असे मत राज ठाकरे यांनी मांडले.

'प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल', राज ठाकरेंची फडणवीस, गडकरींच्या बालेकिल्ल्यात राजगर्जना
Goa Casino : कॅसिनोंसाठी 28 टक्केच जीएसटी

प्रभाग पद्धती बदलण्यावरून आक्षेप

महापालिका निवडणुकांमध्ये दोनचा, तीनचा, चारचा प्रभाग करणं हे साफ चुकीचं. ह्यात फक्त नगरसेवक गब्बर होतो आणि शहरं बकाल होतात. असे राज ठाकरे म्हणाले. लोकांना पाणी फुकट देणं, वीज फुकट देणं ह्या असल्या गोष्टींना माझा विरोध आहे. 'फुकट हवं' ह्यासाठी देशात आजपर्यंत एकही मोर्चा निघाला नाही. लोकं म्हणतात जे द्याल ते माफक दरात, मुबलक प्रमाणात आणि वेळेत द्या. जनतेकडून कर वसूल करायचा आणि मग म्हणायचं आम्ही हे फुकट देऊ. आम्ही ते फुकट देऊ. हे कोणतं अर्थशास्त्र ? असेही राज ठाकरे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com