IPL 2023: केकेआरला दिलासा! 2.8 कोटीत टीममध्ये सामील झाला इंग्लंडचा धडाकेबाज ओपनर

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2023 स्पर्धेसाठी इंग्लंडच्या अनुभवी ओपनरला संघात सामील करून घेतले आहे.
Kolkata Knight Riders
Kolkata Knight RidersDainik Gomantak
Published on
Updated on

Jason Roy Joins KKR for IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या सुरुवातीलाच अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतींचा धक्का बसला आहे. यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही समावेश आहे. त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यातच आता बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने आयपीएल 2023 स्पर्धेतून माघार घेतली आहे.

त्यामुळे आता केकेआरने त्यांच्या संघात इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला संधी दिली आहे. रॉयला यापूर्वीही आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.

Kolkata Knight Riders
IPL 2023: बापरे! तब्बल 20 हजारांचं तिकीट; चाहत्याने अनुभवल्या क्रिकेटर्सलाही मिळत नाहीत अशा सुविधा

केकेआरने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रॉयसाठी 2.8 कोटी रुपये मोजले आहेत. रॉयची आयपीएल 2023 स्पर्धेसाठी लिलावात 1.5 मुळ किंमत होती. पण तो अनसोल्ड राहिला होता. आता त्याला केकेआर संघाने संघात सामील करून घेतले आहे. रॉय आता ९ एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादला 9 एप्रिलला होणाऱ्या सामन्यापासून केकेआरसाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.

रॉयने 2017 साली गुजरात लायन्ससाठी खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो आयपीएलचे अखेरचे 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळला आहे. तो आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 13 सामने खेळला आहे. त्याने या 13 सामन्यांमध्ये 29.91 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 329 धावा केल्या आहेत.

Kolkata Knight Riders
IPL 2023: टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेला 'कॅप्टन' घेणार Gujarat Titans संघात विलियम्सनची जागा

रॉयने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून एका अर्धशतकासह 187 धावा केल्या. तसेच त्याने 116 वनडे सामने खेळले असून 39.91 च्या सरासरीने 12 शतके आणि 21 अर्धशतकांसह 4271 धावा केल्या आहेत.

त्याने 64 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत, ज्यात त्याने 8 अर्धशतकांसह 1522 धावा केल्या आहेत. तसेच त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण 313 टी20 सामने खेळले असून 6 शतके आणि 53 अर्धशतकांसह 8110 धावा केल्या आहेत.

दरम्यान, केकेआरचा संघ यंदाच्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणाच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्यांनी पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला. पण या सामन्यात त्यांना डकवर्थ लुईस नियमानुसार 7 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com